Maize Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Market Rate : बुलढाण्यात रब्बी मक्याचा दर दीड हजारापर्यंत

Maize Production : मका उत्पादनात विदर्भात अव्वल असलेल्या या जिल्ह्यात रब्बी उत्पादक मक्याच्या कमी दरामुळे अडचणीत आले आहेत.

Team Agrowon

Buldana Maize Bajarbhav : मका उत्पादनात विदर्भात अव्वल असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात रब्बी उत्पादक मक्याच्या कमी दरामुळे अडचणीत आले आहेत. काही दिवसांपूर्वी २००० रुपयांवर पोहोचलेला मका सध्या १५०० पासून तर १७०० रुपये प्रतिक्विंटलने विकत आहे. गेल्या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे मका उत्पादकांची एकच घालमेल झाली होती.

सध्या आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी मक्यात आर्द्रतेचे कारण देत भाव पाडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकरी हमीभाव खरेदी सुरु होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. जिल्ह्यात रब्बी हंगामात सुमारे १० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मक्याची लागवड होत असते.

रब्बीत मका उत्पादनात विदर्भात जिल्हा अव्वल स्थानावर असतो. जिल्ह्याचे सरासरी लागवड क्षेत्र ११७८१ हेक्टर असून यंदा तब्बल १९ हजार ८२ हेक्टरवर मका लागवड झाली होती. जिल्ह्यात १३ तालुक्यांत मक्याची पेरणी झालेली आहे.

यावर्षी खरीप हंगामात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने रब्बी लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. रब्बीतील पिकांवर अवकाळीचे संकट सतत राहिल्याने उत्पन्नात मोठी घट झाली होती. प्रामुख्याने मार्च, एप्रिल महिन्यांत ठरावीक कालावधीत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. याचा फटका मका पिकाला बसला होता. सध्या रब्बीतील मका पीक बाजारात दाखल होण्यापूर्वी दर खालावला.

वास्तविक, यापूर्वी बाजारात मक्याचा दर प्रतिक्विंटल दोन हजारांवर होता. सध्या मका काढणी जोमाने सुरू झाली असून, आता या पिकाचा खरेदी दर १४०० ते १५०० दरम्यान अधिक आहे. वास्तविक मक्याचा हमीभाव १९६२ रुपये प्रतिक्विंटल आहे. त्यामुळे मका खरेदीसाठी शासकीय हमीभावाने खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.

आमच्या भागात यंदा मक्याची बेभावाने खरेदी केली जात आहे. वास्तविक देऊळगावराजा तालुक्यात पूर्णा नदीवरील संत चोखामेळा महासागर प्रकल्प आणि इतर प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीनही ऋतूंमध्ये मक्याची लागवड केली जाते. शेतकरी एकरी ३५ क्विंटलपासून ६० क्विंटलपर्यंत उत्पादन काढतात. यावर्षी बंद असलेली नाफेडची खरेदी आणि निसर्गाची अवकृपा यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्के कमी भाव मिळत आहे. सध्या बाजारात आर्द्रता पाहून मका १२०० ते १७०० दरम्यान खरेदी केल्या जात आहे. गेल्यावर्षी याच हंगामात मका हा १८०० ते २४०० दरम्यान विकला होता.
कैलास नागरे, शेतकरी, शिवणी आरमाळ, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT