Maharashtra Assembly Elections 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Election Survey : राज्यात कोणाची सत्ता? महायुती की महाविकास आघाडी?; आयएएनएस आणि मॅट्रिजचा पोल आला समोर

Opinion poll by IANS and MATRIZE : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला अवघे काही दिवस उरले आहे. यादरम्यान आयएएनएस आणि मॅट्रीझ माध्यम समुहाने केलेल्या निवडणूक मतदानपूर्व सर्व्हे समोर आला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : २० नोव्हेंबरला राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. पण याआधी महायुती, महाविकास आघाडीचे नेते आमचीच सत्ता येणार असा दावा करत आहेत. दरम्यान, निवडणुकीपूर्वी आयएएनएस आणि मॅट्रीझ माध्यम समुहाने केलेल्या निवडणूक मतदानपूर्व सर्व्हे (पोल) समोर आला आहे.

सर्वेक्षणानुसार, राज्यात भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला जनतेची पसंती मिळाली आहे. तर काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या सत्ता स्थापनेच्या अपेक्षांना धक्का बसणार आहे.

सत्ता महायुतीला?

या सर्वेक्षणानुसार, राज्यातील २८८ जागांपैकी मविआला १०६ ते १२६ जागा मिळू शकतात. तर महायुती १४५ ते १६५ जागांवर मुसंडी मारू शकते. तसेच मतांच्या टक्केवारीत देखील महायुती मविआवर वरचढ आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला ४७ टक्के मते मिळण्याची शक्यता असून मविआला ४१ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणात, इतरांना १२ टक्के मते मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कोकण अन् पश्चिम महाराष्ट्रात कोणाची बाजी?

ठाणे कोकणच्या ३९ जागांपैकी २३-२५ जागा महायुतीला आणि मविआला १० ते ११ जागा मिळतील, असा अंदाज या सर्वेक्षणामधून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईतील ३६ जागांपैकी १० ते १३ जागांवर मविआला समाधान मानावे लागणार आहे. महायुती २१ ते २६ जागा जिंकण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला ३१ ते ३८ जागांवर यश मिळण्याची शक्यता असून मविआला २९ ते ३२ जागा मिळतील. येथे इतरांना २ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाड्यासह विदर्भातील चित्र

सर्वेक्षणामधून मराठवाड्यात मविआला २० ते २४ महायुतीला १८ ते २४ आणि इतरांच्या २ जागा येतील, असा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात महायुतीला १४ ते १६ मविआला १६ ते १९ जागा मिळू शकतात. विदर्भात महायुतीला ३२ ते ३७ मविआला २१- २६ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना पसंती

या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंतीचा चेहरा म्हणून पसंती मिळाली आहे. शिंदे यांना ४० टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. उद्धव ठाकरे यांना २१ टक्के आणि देवेंद्र फडणवीस यांना १९ टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. तर ६५ टक्के पेक्षा जास्त लोकांनी शिंदे यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केल्याचे या सर्वेतून समोर आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Blockchain Technology: कृषी पुरवठा साखळीसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान

Cotton Farming: कपाशीच्या शाश्‍वत उत्पादनासाठी काटेकोर नियोजनावर भर

Rural Banks: गरिबांना अखेर वाली तो कोण?

Bogus Agriculture Inputs: बनावटगिरीला हवा कायद्याचा धाक

Agriculture Support: भीज पावसामुळे ऊस, तरकारी पिकांना नवसंजीवनी

SCROLL FOR NEXT