Pune News : राज्यात निवडणूकीची धामधूम सुरू असतानाच काँग्रेसने बंडखोरांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. तब्बल १६ जणांना बाहेरचा रस्ता दाखवत बंडखोरांचे निलंबित केले आहे.
राज्यात महायुतीला सत्तेतून खाली खेचण्यासाठी महाविकास आघाडीने चांगले उमेदवार देण्याची रणनीती आणखी होती. मात्र काँग्रेसह उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटात बंडखोरी झाली. यामुळे मविआसमोर पेच निर्माण झाला. यानंतर आघाडीतील अनेक नेत्यांनी बंडखोरांची मनधरणी केली होती. मात्र काही ठिकाणी पक्षातील बंडखोरांनी माघार घेतली नाही. यानंतर काँग्रेसने आपल्या बंडखोरांना कारवाईचा इशारा देताना नोटीस बजावली होती. पण त्यावर कोणतीच प्रतिक्रिया न आल्याने अखेर काँग्रेसने बंडखोरांवर कारवाई केली आहे.
काँग्रेसने अखेरचा निर्णय घेतना बंडखोरांविरोधात कारवाई केली आहे. पण या कारवाईच्या आधी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवू नये, असा इशारा बंडखोरांना दिला होता. काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी अशा बंडखोरांना सहा वर्षांच्या निलंबनाला सामोरे जावे लागेल, असे संकेत दिले होते.
९ दिवसांवर मतदान
राज्यातील विधानसभा निवडणूकीचे मतदान २० नोव्हेंबरला होणार असून, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. तर निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
मतदारसंघ आणि बंडखोर उमेदवार
आरमोरी - आनंदराव गेडाम, शिलू चिमूरकर
गडचिरोली - सोनल कोवे, भरत येरमे
बल्लारपूर - अभिलाषा गावतूरे, राजू झोडे
भंडारा - प्रेमसागर गणवीर
अर्जुनी मोरगाव - अजय लांजेवार
भिवंडी - विलास रघुनाथ पाटील, आसमा जव्वाद चिखलेकर
मीरा भाईंदर - हंसकुमार पांडे
कसबा पेठ - कमल व्यवहारे
पलूस कडेगाव - मोहनराव दांडेकर
अहमदनगर शहर - मंगल विलास भुजबळ
कोपरी पाचपाखाडी - मनोज शिंदे, सुरेश पाटील खेडे
उमरखेड - विजय खडसे
यवतमाळ - शबबीर खान
राजापूर - अविनाश लाड
काटोल - याज्ञवल्क्य जिचकार
रामटेक - राजेंद्र मुळक
काँग्रेसने आधीच दिला होता इशारा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.