Pre Monsoon Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी वादळी पावसाचा दणका सुरूच

Rain Update : पूर्वमोसमी वादळी पावसाने राज्यात चांगलाच दणका दिला आहे. रविवारी (ता. १२) चौथ्या दिवशीही अनेक ठिकाणी पाऊस सुरूच आहे.

Team Agrowon

Pune News : पूर्वमोसमी वादळी पावसाने राज्यात चांगलाच दणका दिला आहे. रविवारी (ता. १२) चौथ्या दिवशीही अनेक ठिकाणी पाऊस सुरूच आहे. तर काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला असून बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या.

दरम्यान छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नगर, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, अकोला आदी ठिकाणी शनिवारी (ता. ११) पावसाने हजेरी लावली. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

या वादळी पावसाने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. तसेच कडब्याची गंजी उडून गेल्याने, भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विजेच्या तारा तुटून विद्युतपुरवठाही खंडित झाला. तर कोकणामध्ये आंबा-काजूच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून, बागायतदार हताश झाले आहेत.

कोल्हापुरातील ६० गावे अंधारात

कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपले. त्यामुळे नानीबाई चिखलीत तीन घरांचे नुकसान झाले. आजऱ्यासह उत्तूर परिसरात विजांच्या कडकडाटासह वळवाचा पाऊस झाला. पावसामुळे शेतवडीत पाणीच पाणी झाले.

आजरा शहरात रस्ते व गटारीतून पाणी वहात होते. या पावसामुळे ऊस व काजू पिकाला फायदा होणार आहे. आजरा सूतगिरणीजवळ ३३ केव्हीच्या उच्च दाबाच्या वाहिनीवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आजरा शहरासह ६० गावे अंधारात होती. तसेच इचलकरंजी, गडहिंग्लज, शिरोळमध्ये दमदार हजेरी लावली.

मराठवाड्यात जोर कायम

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिगोली जिल्ह्यांमध्ये शनिवारी (ता. ११) सायंकाळपासून रविवारी (ता. १२) दुपारपर्यंत अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा जोर कायम होता.

या पावसाने उन्हाळी बाजरी, कांदा बिजवाई, टोमॅटो आदींचे नुकसान झाले. धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे रविवारी सकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. तसेच हिंगोली, परभणी जिल्ह्यांत वाळवत घातलेली हळद, उशिरा पेरणी केलेली, सुगी सुरू असलेली ज्वारी, उन्हाळी पिके, आंबा आदींचे नुकसान झाले.

घरावरचे, तसेच गोठ्यावरील पत्रे उडाले

या वादळी वाऱ्यासह पावसाने, अंजीर, सीताफळ, पेरू, डाळिंबाचे व इतर बागांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या झाडांच्या फांद्या तुटल्या, तर काही

झाडे मोडून पडली. वादळी वारे जोरदार असल्याने अनेक घरावरचे, तसेच गोठ्याचे पत्रे उडाल्याने त्याचेही नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने

झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली.

नगरमध्ये एका व्यक्तीसह १३ जनावरांचा मृत्यू

नगर जिल्ह्यात आठवडाभरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे १३ लहान-मोठी जनावरे आणि ३१ घरांची पडझड झाली आहे. वादळात वीज पडून अकोले तालुक्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर संगमनेर तालुक्यात २, कर्जत तालुक्यात २, जामखेड तालुक्यात १ आणि पारनेर तालुक्यात ८ शेळ्या अशा लहान-मोठ्या १३ जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. यासह कर्जतमध्ये २१, कोपरगावमध्ये ७ आणि पारनेर तालुक्यात ३ अशा ३१ घरांची पडझड झालेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT