Agriculture Pond Agrowon
ॲग्रो विशेष

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Farmer Demand : सिंचन योजनांच्या लाभ क्षेत्रातील तलाव भरून द्यावेत, अशी मागणी शेतकरी करू लागला आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई गडद झाली आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यातील शेतीची तहान भागविण्यासाठी ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचे आवर्तन सुरू आहे. त्यामुळे शेतीची तहान भागली जात आहे. सिंचन योजनांच्या लाभ क्षेत्रातील तलाव भरून द्यावेत, अशी मागणी शेतकरी करू लागला आहे.

मात्र, शेतकऱ्यांच्या मागणीकडे पाटबंधारे विभागाने काणाडोळा केला आहे. त्यातच लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र झाल्याने ऐन पाणीटंचाईत शेतकऱ्यांनी कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.

जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत या सात तालुक्यांत पाणीटंचाई नोव्हेंबर महिन्यापासून जाणवू लागली आहे. त्यामुळे या दुष्काळी पट्ट्यातील भागातील पाण्याची टंचाई कमी व्हावी यासाठी ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचे आवर्तन सुरू केले आहे.

ताकारी योजनेचे तिसरे आवर्तन सुरू आहे. तर टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे पहिले आवर्तन सुरू आहे. या आवर्तनामुळे या सातही तालुक्यांतील पाणीटंचाई काहीशी दूर झाली असल्याचे चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांनी कालव्यातून पाइपलाइन करून शेतीची तहान भागवली आहे.

ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ योजना सुरू होऊन सुमारे पाच ते सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे. या योजनेच्या मुख्य कालवा पोट कालव्यातून लाभ क्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. वास्तविक पाहता, ज्या-ज्या वेळी या योजना सुरू होतात,

त्या-त्या वेळी मुख्य कालवा आणि पोट कालव्याच्या माध्यमातूनच पाणी पुढे लाभ क्षेत्रातील शेवटच्या भागापर्यंत पोहचले जाते. परंतु या वर्षी परिस्थिती वेगळी निर्माण झाली आहे. भूजल पातळी घटली आहे. कुपलनिलका, विहिरीतील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पिकांची तहान कशी भागवायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

योजनेच्या पाण्याने लाभ क्षेत्रातील तलाव भरून द्या, अशी मागणी शेतकरी दर वर्षीच करतात. या वर्षी पाणी टंचाईची दाहकता वाढली आहे. त्यामुळे दर वर्षीप्रमाणे या वर्षीही तलाव भरून द्या, अशी मागणी शेतकरी करत आहेत. पाटबंधारे विभागाकडून तलावात पाणी सोडण्याबाबत कोणतीही भूमिका घेतली नसल्याचे शेतकरी सांगताहेत. प्रशासन, पाटबंधारे विभाग आमच्या मागणीकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे आमच्या प्रश्नाकडे कोण लक्ष देणार असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Insurance Scheme: सुधारित खरीप पीकविमा योजना जाहीर -अर्ज भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत

Environmental Activist Protest: सोनम वांगचुक यांचे उषोषण सातव्या दिवशीही सुरूच; प्रकृतीत बिघाड

Solapur Tree Plantation Scam: सोलापूरमधील ‘३३ कोटी वृक्ष लागवड’ घोटाळ्याचा तपास आता ‘सीबीआय’कडे

Fasting Food Prices: उपवासाच्या पदार्थांच्या दरात उसळी

AIMA Demands: अवजार विक्रेत्यांची चौकशी कृषी विभागानेच करावी

SCROLL FOR NEXT