Papaya  Agrowon
ॲग्रो विशेष

Papaya Cultivation : पपई पीक जोमात, काढणीलाही गती

Papaya Harvesting : आगाप लागवडीच्या पिकात फळधारणा झाली आहे. पीक जोमात असून, काही भागात काढणीलाही गती आली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : उष्णतेचा फटका बसलेले पपई पीक पावसानंतर बऱ्यापैकी सुधारले आहे. पिकाची वाढ चांगली झाली आहे. आगाप लागवडीच्या पिकात फळधारणा झाली आहे. पीक जोमात असून, काही भागात काढणीलाही गती आली आहे.

पपईची लागवड खानदेशात स्थिर आहे. नंदुरबार जिल्हा पपई लागवडीत आघाडीवर आहे. जिल्ह्यात मागील हंगामात सुमारे ५२०० हेक्टरवर पपई पीक होते. एकट्या शहादा तालुक्यात सुमारे साडेचार हजार हेक्टरवर पपई पिकाची लागवड झाली होती. परंतु मागील हंगामात पपईला अल्प दर मिळाला. केवळ ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२३ च्या मध्यापर्यंत दर टिकून होते.

सुरवातीला पपई दर ३० रुपये प्रतिकिलोपर्यंत होते. जशी आवक वाढली तसे पपई दर कोसळले. डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारीत पपईला सरासरी तीन रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. मार्चमध्ये दुसऱ्या आठवड्यात पपई दरात सुधारणा झाली. परंतु मार्च महिन्यापर्यंत अनेकांनी पीक काढून क्षेत्र रिकामे केले. कारण काढणी ठप्प होती.

खरेदीदार पपई घेण्यास येत नव्हते. शेतातच किंवा झाडावर पपई पक्व होऊन खराब होण्याचा प्रकारही वाढला होता. शिवाय नंदुरबार, धुळे जिल्ह्यांत रोगराईमुळे पपई पिकाची हानी झाली. यामुळे पपई लागवड २०२४मध्ये घटेल, असे संकेत होते. पपईची लागवड खानदेशात मार्च ते मे या कालावधीत केली जाते. परंतु अनेकांनी अधिक कालावधीच्या रोगप्रतिकारक्षम पपई वाणांची लागवड केली. ही लागवड जानेवारी व फेब्रुवारीत झाली.

नंदुरबार जिल्ह्यात पपई लागवड घटली आहे. जिल्ह्यातील लागवड २५ टक्के कमी झाली आहे. परंतु जळगाव जिल्ह्यातील लागवड ३० टक्क्यांनी वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, जामनेर व अन्य भागांत पपई पीक अधिक आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा सुमारे १६५० हेक्टरवर पपई पीक आहे. धुळ्यातही सुमारे १२०० हेक्टरवर पपई पीक आहे. तर नंदुरबारातील लागवड साडेतीन हजार हेक्टरपर्यंत आहे.

आगाप पिकाला फटका

आगाप पिकाला यंदा अति उष्णतेचा मोठा फटका बसला होता. नंतर पावसाचाही फटका बसला आहे. मेच्या अखेरीस व जूनच्या सुरुवातीला उष्णता अधिक होती. कमाल तापमान ४७ अंश सेल्सिअस काही भागात होते. याचा फटका एप्रिल व मेमध्ये लागवड केलेल्या व आगाप पिकाला बसला आहे.

काही शेतकऱ्यांचे पपई पीक काढून फेकावे लागले आहे. पिकाचा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी क्रॉप कव्हर व अन्य उपाययोजना केल्या. त्यासाठी खर्चही अधिक लागला. परंतु उष्णतेमुळे उत्पादकतेला फटका बसला असून, काही बागांचा काढणी हंगामही लांबला. आता पिकात फळधारणाही झाली तसेच काही अंशी काढणीही सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manoj Jarange Patil: राज्यात ५८ लाख नोंदी सापडल्या; त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, कोल्हापूर गॅझेटियर लागू करा, जरांगे पाटलांची मागणी

Assembly Elections Update: देशातील ५ राज्यांमध्ये निवडणुका वेळेआधीच होण्याची शक्यता; नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मतदानाची शक्यता!

Livestock Vaccination Campaign: कवलापूर येथे मॉन्सूनपूर्व पशुधन लसीकरण मोहिमेचा प्रारंभ

Maharashtra Monsoon Session 2026: पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून, कामकाज ३ आठवडे चालणार

Organic Fertilizer: शेतीचे नुकसान टाळण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवा : सुधीर शिंदे

SCROLL FOR NEXT