Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक

Chana Sowing : कृषी विभागाच्या लातूर विभागातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांतील रब्बीच्या पेरण्यांनी आता चांगलाच वेग घेतला आहे.
Chana Crop
Chana CropAgrowon
Published on
Updated on

Latur News : कृषी विभागाच्या लातूर विभागातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यांतील रब्बीच्या पेरण्यांनी आता चांगलाच वेग घेतला आहे. आतापर्यंत ५३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. परभणी, हिंगोली व धाराशिव जिल्हे पेरणीत आघाडीवर असून, नांदेड व लातूर जिल्हे मागे आहेत.

येत्या आठवड्यात आणखी पेरण्यांना वेग येणार असून, आतापर्यंत पाच जिल्ह्यांत १३ लाख ६३ हजार ९६० पैकी सात लाख २० हजार ९६० हेक्टरवर (५२.८६ टक्के) रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यात हरभराच हुकमी पीक असून, विभागात चार लाख ८७ हजार ४५९ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Chana Crop
Chana Pest : हरभरा पिकावर ‘कटवर्म’चा प्रादूर्भाव

मागील आठवड्यात पाचही जिल्ह्यांत हवामान थंड व कोरडे असल्याने पेरण्यांना चांगलाच वेग आला. खरिपातील तुरीचे पीक सध्या फुलोऱ्यात असून, कापसाच्या काही भागात दुसऱ्या, तर काही भागात तिसऱ्या वेचण्या सुरू आहेत. खरीप ज्वारी व बाजरी दाणे पक्वतेच्या अवस्थेत असून, काही भागात काढणी सुरू झाली आहे.

सलग दुसऱ्या आठवड्यात रब्बीच्या पेरणीत परभणी जिल्हा आघाडीवर असून, या जिल्ह्यात ६२ टक्क्यांच्या पुढे पेरण्या झाल्या आहेत. हिंगोली जिल्ह्याचा दुसरा क्रमांक असून, जिल्ह्यात ६१ टक्क्यांच्या पुढे पेरण्या उरकल्या आहेत. नांदेड, धाराशिव व लातूर जिल्ह्यांत अजून ५० टक्क्यांच्या आतच पेरण्या असून, येत्या आठवड्यात हा टक्का वाढण्याची आशा आहे.

Chana Crop
Chana Sowing : रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार

आतापर्यंत रब्बी ज्वारीची सर्वसाधारण तीन लाख ७१ हजार ८५७ पैकी एक लाख ७९ हजार ६७९ हेक्टरवर (४८.३२ टक्के) पेरणी झालेली आहे. ज्वारी सध्या वाढीच्या अवस्थेत असून, धाराशिव जिल्ह्यात काही भागांत ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

गव्हाची एक लाख ६५ हजार १९ पैकी ३१ हजार ८०६ (२०.३२ टक्के) हेक्टरवर पेरणी झाली असून, हे पीक सध्या उगवणीच्या अवस्थेत आहे. हरभराची सात लाख ८६ हजार १२४ पैकी चार लाख ८७ हजार ४५९ (६२.०१ टक्के) हेक्टरवर पेरणी झाली असून, हरभरा उगवणीच्या स्थितीत आहेत. तेलबियामध्ये सर्वाधिक करडईची १९ हजार ५३१ पैकी ११ हजार ६०३ (५९.४१ टक्के) हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यानंतर जवळ, तीळ व सूर्यफुलाचीही पेरणी कमीअधिक प्रमाणात झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com