Winter Update : नाशिकचा पारा १०.९ अंशांवर

Weather Update : ऑक्टोबरअखेर कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसवर होते. त्यात चढउतार होत आहे. मात्र त्यानंतर किमान तापमानात घसरण होत असल्याचे दिसून आले.
 Winter Season
Winter SeasonAgrowon
Published on
Updated on

Nashik News : दिवाळीनंतर तापमानात घट होत असल्याने थंडीमुळे गारठा वाढला असून हुडहुडी भरू लागली आहे. जिल्ह्यात चालू वर्षीच्या थंडीत सर्वांत नीचांकी तापमान कुंदेववाडी (ता. निफाड) येथील कृषी संशोधन केंद्र येथे बुधवारी (ता. २०) १०.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

त्यामुळे एकीकडे दिवसा उन्हाचा चटका कायम असून रात्री तापमानात घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबरअखेर कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसवर होते.

त्यात चढउतार होत आहे. मात्र त्यानंतर किमान तापमानात घसरण होत असल्याचे दिसून आले. यापूर्वी सोमवारी (ता. ११) १२.२ पर्यंत सुरुवातीला तापमान कमी झाले होते. मात्र त्यानंतर पुन्हा त्यात चढ-उतार झाला.

 Winter Season
Maharashtra Weather : महाराष्ट्रातील तापमानात घट, गारठा वाढतोय

तर बुधवारी (ता. १३) पारा थेट ११.८ अंशांपर्यंत घसरला. दिवाळीनंतर सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली होती. त्यात पुन्हा वाढ होऊन तापमान १५ अंशांवर गेले. तर पुन्हा पारा १० अंशांपर्यंत खाली आल्याने सध्या थंडीत वाढ झाली आहे.

 Winter Season
Maharashtra Weather : किमान तापमानाचा पारा घसरला

ऑक्टोबरमध्ये मॉन्सूनोत्तर पावसाने जिल्ह्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती.

त्यातच दिवाळीनंतर वातावरणात बदल होऊन थंडी वाढल्‍याची स्थिती आहे. दिवसा कडक ऊन तर सायंकाळनंतर मात्र वातावरणात गारवा जाणवू लागला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com