MLA Yashomati Thakur Agrowon
ॲग्रो विशेष

MLA Yashomati Thakur : तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणूकीत यशोमती ठाकूरांची बाजी

Election of Taluka Kharedi-vikri sangh : राज्यातील जिल्हापरिषदा आणि महानगर पालिकांच्या निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत. तर विरेधकांकडून शिंदे सरकारवर निवडणूका घेण्याची तयारी नाही म्हणून टीका केली जात आहे. याचदरम्यान अमरावतीत पार पडलेल्या निवडणूकीत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकुर यांच्या पॅनेलला घवघवीत यश मिळाले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील जिल्हापरिषदा आणि महानगर पालिकांच्या निवडणूका गेल्या दीड एक वर्षांपासून लटकल्या आहेत. यावरून विरोधकांनी सत्ताधारी महायुतीच्या सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरूवात केली आहे. तर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून सरकारवर याच्याआधीही टीका केली आहे. यादरम्यान अमरावतीत पार पडलेल्या निवडणूकीत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकुर यांनी जोरदार यश मिळवले आहे. तर त्यांनी त्यांचे पॅनेल निवडणून आणले आहे.

आमदार यशोमती ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीत अनेक निवडणूका काँग्रेसने लढल्या आहेत. त्यात त्यांनी यश देखील मिळवले आहे. यंदा येथे तालूका खरेदी विक्री संघाच्या निवडणूक घोषित झाली होती. तेंव्हा पासूनच कोण बाजी मारणार याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले होते. दरम्यान तालूका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत यशोमती ठाकुर यांनी यश मिळवले आहे. तसेच त्यांच्या पॅनेल मधील १७ पैकी १६ प्रतिनिधी संचालक म्हणून निवडणून आले आहेत.

एकहाती सत्ता

पार पडलेल्या अमरावती तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार यशोमती ठाकुर यांच्या पॅनेलमधील १७ पैकी १६ प्रतिनिधींची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आमदार ठाकुर यांनी एकहाती सत्ता आली राखल्याचे बोलले जात आहे.

बिनविरोध निवड

अमरावती तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत अनेकांनी अर्ज भरले होते. त्यामुळे येथे चुरस होईल अशी शक्यता होती. मात्र अर्ज भरलेल्यांपैकी काहींनी माघार घेतल्याने आमदार यशोमती ठाकुर यांच्या पॅनेलमधील १६ जागा बिनविरोध झाल्या.

बिनविरोध निवड झालेले संचालक

१) गणेश कडु

२)भागवतराव खांडे

३) बाळासाहेब किरकटे

४) संजय निचीत

५) प्रशांत काळबांडे

बिनविरोध निवड झालेले संचालक

६) शेखर काळे

७) पंकज देशमुख

८) मुकुंदराव देशमुख

९) प्रविण अब्रुक

१०) पद्‌माकर धोटे

बिनविरोध निवड झालेले संचालक

११) जोत्स्नाताई महल्ले

१२) वैशाली गोपाल राणे

१३) भाष्कर मोहोड

१४) अभय महल्ले

१५) संजय म्हाला

१६) संजय भुयार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 21st Installment: 'या' दिवशी मिळू शकतात पीएम किसानचे २ हजार रुपये?; २१ व्या हप्त्याबद्दल महत्त्वाची माहिती

Monsoon Rain: परभणीत ११४७.५ मिमी, तर हिंगोलीत १३२०.६ मिमी पाऊस

Inspiring Farmer Story: कळसूबाईच्या जंगलातील संसारशाळा

Farmer Subsidy: अडीच हजार शेतकरी अनुदानापासून वंचित

Cashew Farming: नवीन काजू बागेत अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर

SCROLL FOR NEXT