Paddy Procurement Through Cooperative Societies: केरळ सरकारने भात खरेदीची जबाबदारी सहकारी सोसायट्यांकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना जलदगतीने पैसे देणे आणि खरेदी प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी शेतकरी केंद्रित दोन स्तरीय यंत्रणा कार्यान्वित करण्याचा यामागील उद्देश असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे..मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने सोमवारी जारी केलेल्या एका निवेदनाद्वारे दिली. वेळेवर खरेदी केल्याने शेतमालाचे होणारे नुकसान टाळता येईल आणि शेतकऱ्यांना खरेदीच्या वेळीच तत्काळ पैसे मिळतील. भात खरेदीची ही नवीन प्रणाली प्राथमिक कृषी सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून लागू केली जाईल आणि आगामी हंगामापासून त्याची अंमलबजावणी होईल, असे राज्य सरकारने म्हटले आहे..याअंतर्गत, खरेदीसाठी तयार असलेल्या प्राथमिक सहकारी सोसायट्या शेतकऱ्यांकडून थेट भाताची खरेदी करतील. या निर्णयामुळे भात पावती पत्रक (Paddy Receipt Sheet) ज्या आधारे कर्ज दिले जाते; त्यावरील अवलंबित्व टाळता येईल आणि भात खरेदीनंतर शेतकऱ्यांना तत्काळ पैसे मिळण्याची खात्री मिळेल, असा दावा राज्य सरकारने केला आहे..Paddy Procurement: धान खरेदीने उद्दिष्ट ओलांडले.जिल्हा अथवा तालुका स्तरावर नोडल सहकारी सोसायट्या स्थापन केल्या जातील. त्यात सहकारी संस्था, भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्थानिक समित्या आणि वैयक्तिक शेतकरी यांचा भागधारक म्हणून सहभाग असेल. भाताची स्थानिक पातळीवर सहकारी सोसायट्यांमार्फत खरेदी केली जाईल. नोडल सोसायट्यांच्या मालकीच्या गिरण्या तसेच भाड्याने चालवण्यासाठी घेतलेल्या गिरण्या अथवा खासगी गिरण्यांमध्ये भातावर प्रक्रिया केली जाणार आहे. निर्धारित तांदूळ उतारा गुणोत्तरनुसार प्रक्रिया केल्यानंतर, हा तांदूळ सार्वजनिक वितरणासाठी पुरवला जाईल. केरळ राज्य नागरी पुरवठा महामंडळ ही भात खरेदीसाठी नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार आहे..Paddy Procurement: भाताच्या सरकारी खरेदीला वेग, साठा १२ टक्क्यांनी वाढला, अधिक निर्यातीची संधी.अतिरिक्त निधीची कमतरता असलेल्या सहकारी सोसायट्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी, राज्य सरकार केरळ बँकेमार्फत एक विशेष आर्थिक सहाय्य कर्ज योजना सुरू करणार आहे, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.