Nashik News: सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे वावी उपबाजार आवारात पशू पक्षी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते झाले. पाचशेहून अधिक जनावरे या प्रदर्शनात होते. .प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, बाळासाहेब वाघ, भारत कोकाटे, सोमनाथ पावसे, नगरसेवक उदय गोळेसर, मनोज देशमुख, अमोल झगडे, नीलेश केदार, सभापती श्रीकृष्ण घुमरे, उपसभापती सिंधू कोकाटे, संचालक शरद थोरात, जालिंदर थोरात, शशिकांत गाडे, गणेश घोलप,.Livestock Exhibition : प्रदर्शनात विविध जातींच्या पशुधनाचे मोठे आकर्षण.अनिल शेळके, प्रकाश तुपे, सुरेखा पांगारकर, रवींद्र शिंदे, सुनील चकोर, नवनाथ नेहे, शरद चतुर, रवींद्र शेळके, सचिव विजय विखे आदी उपस्थित होते. विवेक कोल्हे यांनी आगामी काळात कोपरगाव व सिन्नर दोन्ही समिती मिळून प्रदर्शन भरविण्यात येईल, असे सांगितले..Livestock Exhibition: वावी येथे प्रथमच पशू प्रदर्शन, विविध स्पर्धांचे आयोजन.पहिल्या दिवशी प्रदर्शनात विविध जातीच्या १५० गायी, ६० हून अधिक बैल, २५ घोडे, २० कालवडी, ३० हून अधिक शेळी, मेंडी, कोकरू अशी जनावरे आली होती. विविध जातीची ही जनावरे एकाच छताखाली पाहण्यास मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या जनावरांची माहिती घेतली. यात खरेदी-विक्रीचे व्यवहारही झाले आहे..आता शनिवारी जनावरांचा बाजारशेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन उपयुक्त असून त्यांना याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार वाजे यांनी केले. वावीत होणाऱ्या प्रदर्शनाचा विशेष आनंद होत असून नवनवीन तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती करून घ्यावी. प्रत्येक शनिवारी जनावरांचा बाजार होणार असल्याने त्यासाठी पशुधन विक्रीसाठी आणावे, असे आवाहन वाजे यांनी केले. एचएफ गायीचा पहिला व्यवहार १ लाख ११ हजारांचा झाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.