Lumpy Skin Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy Skin Disease: अहिल्यानगर जिल्ह्यात ‘लम्पी’चा प्रादुर्भाव कायम

Livestock Infection: अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जनावरांना ‘लम्पी स्कीन’ची बाधा वाढत आहे. आतापर्यंत ८१० जनावरांना प्रादुर्भाव झाला असून, त्यापैकी ४४४ जनावरे उपचारातून बरी झाली आहेत. आतापर्यंत ३० जनावरांचा मृत्यू झाला आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जनावरांना ‘लम्पी स्कीन’ची बाधा वाढत आहे. आतापर्यंत ८१० जनावरांना प्रादुर्भाव झाला असून, त्यापैकी ४४४ जनावरे उपचारातून बरी झाली आहेत. आतापर्यंत ३० जनावरांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३३६ जनावरांवर उपचार सुरू असून, पशुसंवर्धन विभागाने १७२ प्रतिबंधित केंद्रे जाहीर केली आहेत. संबंधित गावांच्या परिसरातील पाच किलोमीटर परिसरात दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यात पशुधनांची संख्या अधिक असून, गायवर्गीय जनावरांची संख्या जवळपास १४ लाखांवर आहे. सुरुवातीला जनावरांना लम्पीचा फारसा प्रादुर्भाव नव्हता, मात्र अलीकडच्या काही दिवसांपासून लम्पीचा प्रादुर्भाव वाढला. आतापर्यंत जिल्‍ह्यात ८१० जनावरे बाधित झाली आहेत. त्यात राहाता तालुक्यात १९१, कोपरगावला ८९, कर्जतला ८७, जामखेडला पाच, अकोल्याला ८, अहिल्यानगरला २, पारनेरला २९,

राहुरीला ५७, संगमनेरला १११, शेवगावला ३३, श्रीगोंदा येथे १७, नेवाशात १५७, कोपरगावला ८९, व श्रीरामपूरला १७ जनावरे बाधित झाली. त्यातील ३० जनावरांचा मृत्यू झाला असून, त्यात राहात्याला १५, नेवासा, संगमनेर, कोपरगाव येथे प्रत्येकी चार, राहुरीला १, शेवगावला दोन जनावरे दगावली आहेत.

४४४ जनावरे आजारातून बरी झाली आहेत. सध्या ३३६ जनावरांवर उपचार सुरू आहेत. १७२ गावांत ही बाधित जनावरे आढळली. त्या गावांसह परिसरातील पाच किलोमीटर अंतरावर नियंत्रित क्षेत्र केले आहे. शेतकऱ्यांनी जनावरांच्या गोठ्यात फवारणी करून गोचिड निर्मूलन करण्यासाठी दवाखान्यात औषधे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता नजीकच्या दवाखान्यात बाधित जनावरांना उपचार करून घ्यावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

वासरांची संख्या बऱ्यापैकी

लम्पी आजाराने बाधित होणाऱ्या जनावरांत वासरांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात बाधित ८१० जनावरांमध्ये वासरांची संख्या ३४० एवढी आहे. त्यातील १७६ वासरे आजारातून बरी झाली आहेत. या आजारातून जनावरे आणि त्यासोबत वासरे बरी होण्याचे प्रमाण चांगले असले तरी बाधितांत वासरे अधिक असल्याचे अहवालावरून दिसून येत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात लम्पीची बाधा होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभाग शक्य त्या उपाययोजना करीत आहे. शेतकऱ्यांतही त्याबाबत जागृती केली जात असून लसीकरण, बाधित जनावरे आढळून येत आहेत. त्या गावासह परिसरातील पाच किलोमीटर परिसराला नियंत्रित केंद्र करण्यासह अन्य बाबी प्राधान्याने केल्या जात आहेत. लम्पीतून बरे होण्याचे जनावरांचे प्रमाण चांगले आहे.
संतोष पालवे, प्रभारी पशुसंवर्धन उपायुक्त, अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gaurakshak In Maharashtra : गोरक्षकांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पोलिसांना सूचना; कुरेशी संघटना मात्र बहिष्कारावर ठाम

Satbara Records: सातबारामधील विविध नोंदींचे महत्त्व

Veterinary College Akola: डॉ. रामास्वामी यांनी केली नवीन ‘पशुवैद्यकीय’च्या इमारतीची पाहणी

Sharad Pawar: मतांमध्ये फेरफार करून १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दोघांनी दिली होती; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Industrial Packaging: मोठ्या आकाराचे पॅकेजिंग प्रकार

SCROLL FOR NEXT