Monsoon Session Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Session : शेतकरी प्रश्नावरून विरोधक आक्रमक;  विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी 

The opposition is aggressive on the issue of farmers : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू होत आहे. तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत.  

Aslam Abdul Shanedivan

Pune News : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन गुरूवारपासून  (ता.२७) सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकरी प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात,  भाई जगताप, सतेज पाटील, रविंद्र धंगेकर, अनिल देशमुख यांच्यासह मविआतील आमदार उपस्थित होते. 

महायुती सरकारचे यंदाचे शेवटचे पावसाळी अधिवेशन असून शेतीप्रश्नासह विविध प्रश्नांवरून वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे. यादरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध मुद्यांच्या आशयाचे बॅनर हातात घेऊन विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकरी विरोधी महायुती सरकारचा धिक्कार असो, ४० टक्के सरकार हाय हाय अशा घोषणांनी विरोधकांनी परिसर दणाणला सोडला. 

यादरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांच्या समोर आले. यावेळी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी जोतदार घोषणा दिल्या. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना आत आम्हीच आहोत असा इशारा दिला. यावेळी शिंदेंच्या बरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दादा भूसेंह इतर नेते उपस्थित होते. 

ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडू. शेतकऱ्यांना महायुती सरकारने फसवले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कोणतेही अनुदान मिळालेले नाही किंवा कोणताच लाभ सरकारने दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशी विरोधकांची मागणी असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. 

याआधी सत्ताधारी पक्षाच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. याची घोषणा विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली होती. तसेच विरोधकांनी सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे सांगताना वडेट्टीवार यांनी महायुती टीका केली होती. 

या प्रश्नावरून सरकारची कोंडी?

शेतकरी कर्जमाफी, दूध दर, नीट परीक्षेतील गोंधळ, बोगस बियाणे, बेरोजगारी, शेतकरीला पीक कर्ज योजना, पुणे ड्रग्ज प्रकरण, पुणे हिट अँड रन जामीन प्रकरण, पेपर फुटी यासह अनेक मुद्दे असतील 

Vice President Election: जे.पी. नड्डा उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे अधिकृत उमेदवार; एनडीएच्या बैठकीत शिक्कामोर्तब

Hatnur Dam : ...आतापर्यंत केवळ हतनूर सिंचन प्रकल्पातूनच विसर्ग सुरू

Ladki Bahin Yojana : लाखावर ‘लाडक्या बहिणी’ लाभापासून राहणार वंचित

e-Peek Pahani : शेतकऱ्यांच्या ई-पीकपाहणीला जळगाव जिल्ह्यात गती

Banana Plantation : उशिराची मृग बहर केळी लागवड सुरू

SCROLL FOR NEXT