Issue's of Farmers : शेतकऱ्यांच्या आत्महत्या महायुतीचं अपयश; वडेट्टीवारांची सरकारवर घणाघाती टीका!  

Leader Of Opposition Vijay Wadettiwar : मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. जालन्यातील जवखेडच्या संत्रे कुटुंबाला सत्ताधारी पक्षातील खासदार आणि आमदाराच्या कार्यकर्त्यांनी मारहाण झाली. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.  
Suicide of Farmers
Suicide of FarmersAgrowon

Pune News : जालन्यातील जवखेडच्या संत्रे कुटुंबाला करण्यात आलेल्या मारहाणी प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी (ता. ३०) राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच शेतकरी आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. महायुती सरकारच्या अपयशी कारभारामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत, असा आरोप वडेट्टीवारांनी केला. त्याचबरोबर जालन्यातील जवखेडच्या संत्रे कुटुंबाला मारहाण प्रकरणी विधानसभेत आवाज उठवणार असंही आश्वासन त्यांनी दिलं. छ. संभाजीनगर आणि जालन्यातील दुष्काळी पाहणी दौऱ्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.  

मराठवाड्यात शेतकऱ्याची आत्महत्या

मराठवाड्यातील छ. संभाजीनगर जिल्ह्यातील पिंपळखुंटा येथील ५२ वर्षीय विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेती गहाण ठेऊन कर्जाचे पैसे काढले होते. मात्र बँक मॅनेजर ते पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने दाभाडे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप शेतकऱ्याच्या कुटुंबाने केला. याच आरोपाचा आधार घेत वडेट्टीवार यांनी दाभाडे यांच्या आत्महत्येला जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Suicide of Farmers
Vijay Wadettiwar : कापूस, कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकरीच सरकारची मस्ती उतरवतील : वडेट्टीवार

तसेच कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही काँग्रेस ठामपणे उभी असल्याचा विश्वास दाभाडे यांच्या कुटुंबियांना वडेट्टीवार यांनी दिला. वडेट्टीवार  म्हणाले, "हे प्रकरण गंभीर असून शेतकऱ्यांची आत्महत्या या कारणामुळे होणे हे महायुती सरकारचे हे अपयश आहे. दाभाडे यांच्या कुटुंबियांना सरकारने न्याय देताना आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात." असंही ते म्हणाले.

संत्रे कुटुंबियांची घेतली भेट 

वडेट्टीवार यांनी जालन्यात जाऊन संत्रे कुटुंबियांची भेट घेतली. सत्ताधारी खासदार, आमदाराच्या कार्यकर्त्यांनी संत्रे कुटुंबाला मारहाण करत जमिनीसाठी दबाव टाकल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार म्हणाले, जवखेडा गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गसाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी संत्रे कुटुंबियांवर जमिनीसाठी दबाव टाकला. मात्र जमीन मिळत नसल्याने कार्यकर्त्यांनी संत्रे कुटुंबाला मारहाण केली. संत्रे यांच्या घरात घुसून नासधूस केली. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमबाह्य पद्धतीने संत्रे यांचे घरच उद्ध्वस्त केले, असा आरोप संत्रे कुटूंबानी केला आहे. संत्रे कुटुंबियांनी हसनाबाद पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. यानंतर संत्रे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. 

Suicide of Farmers
Vijay Wadettiwar : संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिएकरी २५ हजार रुपये द्या ; विजय वड्डेटीवर यांची मागणी

संत्रे कुटुंबाला केलेली मारहाण म्हणजे सत्तेचा माज आहे. एखाद्या गावात जमिनीवर नजर पडली तर ती जागा दानवे यांना दिली पाहिजे, असा दबाव सत्ताधारी खासदार, आमदार शेतकऱ्यांवर टाकत आहेत. जमीन हडपण्यासाठी भाजपवाल्यांना महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आणायचे आहे  का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन काय करत आहे? असा सवाल करताना, सत्तेतील मस्ती आम्ही उतरवणार असेही वडेट्टीवार म्हटले आहे. 

संत्रे  कुटुंबाच्या पाठीशी आम्ही उभे असून त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. पण या कुटुंबाला काही झालं तर यासाठी दानवे कुटुंब याला जबाबदार असेल असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे. दरम्यान सदर घटना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या गावात घडल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com