Anil Ghanwat Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Company : पीकविमा न देणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार

Anil Ghanwat : गेल्या वर्षीचा (२०२३-२४) खरीप व रब्बी हंगामांतील पीकविमा मिळालेला नाही. त्यामुळे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या पुणे येथील मुख्य कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा (२०२३-२४) खरीप व रब्बी हंगामांतील पीकविमा मिळालेला नाही. त्यामुळे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या पुणे येथील मुख्य कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात येणार आहे.

स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली १ ऑगस्ट रोजी हे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

अनिल घनवट म्हणाले, ‘‘नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन २०२३-२४ मधील खरीप व रब्बी पिकांच्या पीकविमा नुकसानभरपाई २० जुलैपर्यंत खात्यावर जमा करण्याचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे राज्य व्यवस्थापक विनायक दीक्षित यांनी २० जून रोजी दिले होते.

जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय नगर येथे जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हे आदेश लेखी देण्यात आले होते. परंतु अद्याप नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत.

३१ जुलैपर्यंत पैसे खात्यावर जमा करण्यात यावेत अन्यथा १ ऑगस्टला ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या पुणे येथील मुख्य कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात येईल, त्या संदर्भात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला निवेदन दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT