Nira Water Canal Agrowon
ॲग्रो विशेष

Circulation of Water : निवडणुकीआधी सुरू केलेले नीरेचे आवर्तन निवडणुकीनंतर बंद

Nira Water Issue : लोकसभा निवडणुकीआधी गाजावाजा करत नीरा उजवा कालव्याचे आवर्तन सुरू करण्यात आले. पण निवडणूक पार पडताच, ते आता बंद झाल्यामुळे सांगोला, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Team Agrowon

Sangola News : लोकसभा निवडणुकीआधी गाजावाजा करत नीरा उजवा कालव्याचे आवर्तन सुरू करण्यात आले. पण निवडणूक पार पडताच, ते आता बंद झाल्यामुळे सांगोला, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, कालव्याचे हे आवर्तन दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले असल्याचे परिपत्रक पुणे पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप यांनी प्रसिद्धीस दिले आहे. ऐन उन्हाळ्यात नीरा उजव्या कालव्याचे पाणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. पण सुरू असणारे पाणी अचानक बंद झाले.

विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर मोठा गाजावाजा करत हे पाणी सोडण्यात आले. पण निवडणूक झाल्यानंतर लागलीच ते बंद करण्यात आल्याने, या प्रश्नात काही राजकारण तर नाही ना, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

या पाण्यामुळे सांगोला, पंढरपूर व माळशिरस परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला, ऐन उन्हाळ्यात पिकांच्या पाण्याची सोय झाली. निवडणुकीतही त्यावरून बरेच राजकारण घडले, पण आता ते बंद करण्यात आल्याने या प्रक्रियेवरच प्रश्न निर्माण झाला आहे.

यावर पुणे पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप यांनी एका प्रसिद्ध पत्रकादवारे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे, की नीरा उजवा कालवा किमी ४९/९०० सेवा पथकाकडील बाजूस गळ पडून गळती होत आहे.

या ठिकाणी कालवा विसर्ग कमी करून गळती रोखण्याचे काम सुरू आहे, सध्या या कामात अंशतः यश आले आहे, परंतु गळती पूर्णपणे रोखली गेली नाही. याबाबत फलटणच्या कार्यकारी अभियंत्यांना कळविले आहे, लवकरच ही दुरुस्ती होईल, असे त्यांनी त्यात म्हटले आहे. पण आता यामागे काही राजकारण दडले आहे का, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT