Agriculture Technology Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Technology : नव्या पिढीला स्मार्ट तंत्रज्ञानाची गरज

KVK : कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती द्यावी. कमीत कमी वेळेत अधिक लोकांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचले पाहिजे.

Team Agrowon

Wangaon News : कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती द्यावी. कमीत कमी वेळेत अधिक लोकांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचले पाहिजे. तरच शेतकरी त्याचा वापर करून उत्पन्न मिळवू शकेल.

नव्या पिढीला स्मार्ट तंत्रज्ञानाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केले.

कोकणातील चारही कृषी विज्ञान केंद्राचा आढावा आणि उपक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी शास्त्रीय सल्लागार समितीची सभा नुकतीच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे झाली. त्या वेळी कुलगुरू भावे बोलत होते.

बदलत्या हवामानानुसार शेतीपूरक व्यवसायावर भर द्यावे. केंद्र सरकारच्या १०० दिवस नियोजनानुसार केंद्राने कौशल्य आधारित प्रशिक्षण घ्यावे, असे अटारी पुणे येथील संचालक डॉ. एस. के. रॉय यांनी सूचवले. तर मुख्य वैज्ञानिक डॉ. शाकीर अली यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे सूचवले.

शेतकऱ्यांची उपस्थिती

चिकू फळगळ व्यवस्थापनाबाबत विद्यापीठाने संशोधन करण्याची गरज असल्याचे पालघर जिल्ह्यातील कृषिभूषण यज्ञेश सावे यांनी सांगितले. वाडा येथील प्रगतिशील शेतकरी राजेश रिकामे यांनी शेतीमध्ये तरुणाचा सहभाग वाढवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने विविध उपक्रम आयोजित करावेत, असे सांगितले. तसेच कमी उंची आणि न लोळणे हे गुणधर्म प्रसिद्ध वाडा कोलम भातामध्ये कसे येतील, यासाठी विद्यापीठाने संशोधन करावे, असे सूचवले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Cultivation Techniques: कापूस उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धत

Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा

Agriculture Crisis: दिल्लीतील घोषणा अन् शिवारातील वेदना

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

SCROLL FOR NEXT