Green House Agrowon
ॲग्रो विशेष

हरितगृहांतील वायू उत्सर्जन कमी करण्याची गरज

पोट्सडॅम संस्थेच्या गटाने हवामानाच्या प्रभावाच्या संशोधनासाठी परिणामात्मक अन्न आणि जमीन प्रणाली मॉडेलचा वापर केला.

टीम ॲग्रोवन

जर्मनीतील विद्यापीठाच्या संशोधकांचे अन्न व्यवस्थेबाबत संशोधन पोट्सडॅम, जर्मनी (वृत्तसंस्था) ः जर्मनीच्या पोट्सडॅम विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या गटाने केलेल्या अभ्यासानुसार जागतिक अन्न व्यवस्थेत बदल करण्याबरोबरच हरितगृहांमधील वायू उत्सर्जनही खूप कमी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

पोट्सडॅम संस्थेच्या गटाने हवामानाच्या प्रभावाच्या संशोधनासाठी परिणामात्मक अन्न आणि जमीन प्रणाली मॉडेलचा वापर केला. अन्न क्षेत्रातील हरितगृहांचे उत्सर्जन कमी करून कार्यक्षमता वाढीवर होणाऱ्या परिणामांचा त्यांनी अभ्यास केला. यामध्ये त्यांना आढळून आले की, आहारातील बदल, उत्सर्जनाचे मूल्य आणि आंतरराष्ट्रीय उत्पन्नाच्या हस्तांतरामुळे जागतिक अन्‍न व्यवस्था २१ व्या शतकाच्या शेवटापर्यंत समतोल उत्सर्जनाच्या टप्प्यावर येईल आणि त्याच वेळी वाढत्या लोकसंख्येसाठी अधिक आरोग्यदायी आहार पुरवू शकेल. केवळ सध्याच्या आपल्या अन्न व्यवस्थेचा आकार थोडा कमी केल्याने हे उत्सर्जन फार कमी होणार नाही. तर आपल्याला या अन्न व्यवस्थेची प्रकृतीच पूर्णपणे बदलावी लागेल, असे मत संशोधक बेंजामिन बोडिर्स्की यांनी व्यक्त केले.

एकीकडे लोकांनी आवश्‍यक पोषक घटकांचा वापर करावा, अधिक संतुलित आहार घ्यावा ज्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पालेभाज्यांचा वापर करावा आणि मांसाहाराचा कमी वापर करावा. दुसरीकडे अन्न पदार्थ निर्मितीमध्ये कमी प्रदूषित प्रकाराचा अवलंब करून त्यांची कार्यक्षमता वाढवावी. खतांचा योग्य वापर आणि अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांची लावगड करावी. त्याचबरोबरीने शेतकऱ्यांनी कमी उत्सर्जन करणाऱ्या कृषी उत्पादनांकडे वळावे. कारण कमी उत्सर्जन म्हणजे खर्च कमी. या गोष्टींमुळे निश्‍चितच हरितगृहांतील उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Double Income : भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी; अखिलेश यादवांची शेतकरी प्रश्नांवरून टीका

Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले

Marathwada Water Project: मराठवाड्याचा पाणीप्रश्न ऐरणीवर

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Maratha Protest: मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार : जरांगे

SCROLL FOR NEXT