Protection Of Environment Agrowon
ॲग्रो विशेष

Protection Of Environment : जागतिक वसुंधरा दिन का साजरा केला जातो?

पर्यावरणाच्या संरक्षणाबरोबरच त्याचे संवर्धन करण्याची सर्व मानवजातीमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो.

Team Agrowon

Nagar News : पर्यावरणाच्या संरक्षणाबरोबरच त्याचे संवर्धन करण्याची सर्व मानवजातीमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो.

रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा भरमसाट वापर तसेच प्लॅस्टिकच्या अनिर्बंध वापरामुळे पाण्याचे व मातीचे प्रदूषण तसेच औद्योगिकरणामुळे हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून जागतिक तापमानात वाढ झाल्यामुळे शेती क्षेत्रावर अनिष्ट परिणाम होत आहेत.

सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच पृथ्वीच्या संवर्धनाबरोबरच संरक्षण होणे शक्य असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात अहमदनगर लोकल सेंटरच्या अभियांत्रिकी संस्था, महात्मा फुले कृषी विद्यापीठ व अहमदनगर येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या विद्यमाने वसुंधरा दिवस-२०२३ चे आयोजन करण्यात आले होते. '

अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील होते. जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुधाकर येलगट्टा, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, एम. एम. अनेकर, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील, डॉ. अतुल अत्रे व अभय राजे उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, की भारत हा जगामध्ये सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश बनला आहे. जास्त लोकसंख्येचा भार पर्यायाने अगोदरच मर्यादित असलेल्या नैसर्गिक संसाधनांवर पडत असून त्यामुळे पाणी, माती व हवा प्रमाणापेक्षा जास्त प्रदूषित झालेली आहे.

प्रत्येकाने आपल्या गरजा मर्यादित ठेवण्याबरोबरच, प्लॅस्टिकचा मर्यादित वापर करणे, कचरा गोळा केल्यानंतरचे योग्य नियोजन तसेच पुनर्वापराचे नियोजन केले तरच प्लॅस्टिकचे दुष्परिणाम कमी करता येतील.

अ‍ॅड. सुधाकर यारलागड्डा यांनी आपल्या भाषणात आपली संस्कृती तसेच वारसा जपण्याचे आवाहन करून युवकांनी आपल्या विवेक बुद्धिचा वापर करून स्वतःला घडविण्याचे आवाहन केले. पैशाच्या मागे न धावता गौरवशाली, समाधानी जीवन जगा व शेतीला न विसरण्याचे आवाहन त्यांनी केले.

डॉ. सुनील गोरंटीवार यांनी प्रत्येकाची प्रबळ अशी इच्छाशक्तीच पृथ्वीला वाचवू शकते असे सांगितले. पृथ्वीतलावरील जैवविविधता जपण्यासाठी शाश्वत उपाययोजना राबविण्याविषयी तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठ यादृष्टीने करत असलेल्या संशोधनाबद्दल त्यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. दिलीप पवार यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT