Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : मराठवाड्यात पाऊस वाढणार; राज्यातील बहुतांशी ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

Monsoon Rain Update : हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात आणखी पावसाचा जोर पुन्हा एखदा वाढला आहे. तर काही भागात पावसाची उघडीप कायम आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला. 

हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगली, चंद्रपूर आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर मराठवाडा आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही देण्यात आला. 

उद्या रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा आणि पुणे, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर सिंधुदूर्ग, ठाणे, यवतमाळ, वाशीम, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

शुक्रवारपासून राज्यातील आणखी काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तसेच शनिवारी मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT