Maharashtra Assembly Elections 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेच्या १२ जागांबाबत कोणतीही तडजोड नाही; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात काहीच दिवसात विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून जागा वाटपावरूनच रस्सी खेच पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीसह महायुतीच्या जागा वाटपांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या यादरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मविआकडे निवडणुकीत १२ जागांची मागणी केली आहे. ही मागणी माकपसह इतर डाव्या व पुरोगामी पक्षांनी केली आहे.

राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी माकपने राज्यभरात पक्षाचे व जनसंघटनांचे जाळे मजबूत केलं आहे. वेळोवेळी प्रदीर्घ व यशस्वी लढे दिले आहेत. यामुळेच केवळ १२ जागांची मागणी मविआकडे केली आहे. तसेच प्रभाव असलेल्या मर्यादित जागांवर हक्क सांगताना यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही स्पष्टीकरण माकपने दिले आहे.

याबाबत माकपने दोन महिन्यांपूर्वीच आपली भूमीका स्पष्ट केली आहे. तर मविआचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात या नेत्यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी १२ जागांची यादी देण्यात आली होती. तर या १२ जागा माकपला सोडाव्यात अशी मागणी केली होती.

पण आता मविआतील प्रमुख तीन पक्ष माकप व डाव्या पुरोगामी शक्तींना गृहीत धरून जागावाटपाबाबत चर्चा करत आहेत. जे योग्य नाही. या चर्चेत अथवा प्रक्रियेत इतर डावे पक्ष व पुरोगामी शक्तींना अद्याप घेण्यात आलेले नाही. मविआच्या नेत्यांनी असे करणे आघाडीच्या अंतर्गत एकजुटीसाठी हे घातक असल्याचा इशारा माकपने यावेळी दिला आहे.

तर लोकसभा निवडणुकीमध्ये देखील मविआच्या तिन्ही पक्षांनी आप आपल्या पदरात जागा पाडून घेतल्या. तर माकपसह इतर पक्षांसी फक्त पाठिंब्यासाठी चर्चा केली. त्यावेळी देखील माकपने याबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र यानंतरही आघाडीने पुन्हा एकदा लोकसभेचा कित्ता विधानसभेच्या वेळेस देखील गुरवत असल्याचे दिसत आहे. यामुळे मविआच्या नेत्यांनी समान कार्यक्रम आखावा. माकपसह इतर इतर डावे पुरोगामी पक्ष व विविध जनसंघटनांना सोबत घेऊन चर्चा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी माकपने महाविकास आघाडीतील विरोधी भूमीकेवर भाष्य केलं आहे. महायुतीतील तीनही पक्ष वेगवेगळ्या संवाद यात्रा, सभा व प्रसार माध्यमांमधील चर्चेच्या माध्यमातून जनतेसमोर जात आहेत. तर ज्या जागा माकपने व इतर डाव्या पक्षांनी मागितल्या होत्या तेथे आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यामुळे आघाडीने अशावेळी योग्य भूमिका घेत समन्वय व एकजुटी दाखवावी. अन्यथा आगाडीच्या एकजुटीच्या प्रक्रियेस बाधा येईल. तसेच माकपने व इतर डाव्या पक्षांना संघटनाना दूर ठेवून आघाडीला निवडणूक जिंकता येईल, असे मानने अतिआत्मविश्वासाचे ठरू शकते असेही माकपने म्हटले आहे.

यामुळे निवडणुकीच्या जागा वाटपाच्या प्रक्रियेत मविआने मापकसह सर्व डावे व लोकशाहीवादी पक्ष व पुरोगामी संघटनांना तातडीने सामावून घ्यावे. १२ जागा देण्यात याव्यात. पण तसे झाले नाही तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी मविआची असेल. जे डावे पक्ष व पुरोगामी शक्तींना गृहीत धरतात असा इशाराही माकपने दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dhananjay Munde : उद्याच कापूस आणि सोयाबीनचं अनुदान ६५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंची पुन्हा ग्वाही

Bogus Fertilizer : बोगस निविष्ठा प्रकरणात कृषी विभागाची भूमिका संशयास्पद

Cotton Productivity : सघन कापूस लागवड उत्पादकता वाढीस पूरक

Rabi Season 2024 : रब्बीसाठी तीन लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

Agriculture Awards : सरकारच्या कृषी पुरस्कार गोंधळ; शेतकऱ्यांच्या रोषानंतर कार्यक्रम सुरू

SCROLL FOR NEXT