Assembly Election : हरियाणा, जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा; महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लांबणीवर

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (ता.१६) दोन राज्यातील निवडणुकीचं वेळपत्रक जाहीर केलं आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची बिगुल वाजलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकाची घोषणा केली
Rajiv Kumar
Rajiv KumarAgrowon
Published on
Updated on

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (ता.१६) दोन राज्यातील निवडणुकीचं वेळपत्रक जाहीर केलं आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची बिगुल वाजलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकाची घोषणा केली. जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिला टप्प्यासाठी सप्टेंबर १८ रोजी मतदान होणार आहे. तर दुसऱ्या २५ आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबर रोजी होईल. हरियाणामध्ये मात्र एकाच टप्प्यात म्हणजेच १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीर आणि हरियाणामध्ये मतमोजणी ४ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.

२०१९ मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये एकाच दिवशी दिवशी म्हणजे २१ ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी मतदान झाले होते. त्यामुळे यंदाही हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी मतदान होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबद्दल पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. कुमार म्हणाले, "२०१९ साली जम्मू आणि काश्मीरची निवडणूक झाली नव्हती. यंदा मात्र तिथे निवडणूक होत आहे. तसेच महाराष्ट्रात पाऊसकाळ सुरू आहे आणि सणांचा सीझनही सुरू होणार आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणूक घेण्यासाठीची आयोगाची तयारीही पूर्ण झालेली नाही." असं कुमार म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक दोन आठवडे लांबणीवर पडण्याची चर्चा आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये २०१४ मध्ये निवडणूक झाली होती. त्यानंतर यंदा निवडणूक होत आहे. अलीकडेच ९ ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक आयोगाने जम्मू आणि काश्मीरचा दौरा केला होता. त्यानंतर लवकरच निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. तर ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुका घेण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालययाने दिले होते. तर हरियाणामध्ये २०१९ मध्ये निवडणूक झाली होती. त्याचवेळी महाराष्ट्रातही निवडणूक घेण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातही निवडणुकीचं बिगुल वाजेल अशी चर्चा होती.

Rajiv Kumar
Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीबाबत २९ ला निर्णय

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे शुक्रवारी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकी तारखेची घोषणा केली जाईल, अशी चर्चा होती. परंतु निवडणूक आयोगाने हरियाणा जम्मू काश्मीर या दोनच राज्यात निवडणूकीची घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लांबणीवर पडल्याचं बोललं जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com