Weedicide  Agrowon
ॲग्रो विशेष

Weedicide Use : खानदेशात तणनाशकांचा बाजार जोरात

Labor Shortage : मजूरटंचाई व सततचा पाऊस यामुळे खानदेशात तणनाशकांचा वापर यंदा २० टक्क्यांनी वाढल्याचे दिसत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : मजूरटंचाई व सततचा पाऊस यामुळे खानदेशात तणनाशकांचा वापर यंदा २० टक्क्यांनी वाढल्याचे दिसत आहे. कापूस, केळी, ऊस, मका, तूर, उडीद, मूग, सोयाबीन आदी सर्व पिकांत तणनाशकांचा उपयोग होत आहे.

एकट्या जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत नऊ लाख लिटर विविध तणनाशकांचा उपयोग झाल्याचा अंदाज आहे. तर धुळे व नंदुरबारातही सुमारे तीन लाख लिटरपेक्षा अधिकचा उपयोग तणनाशकांचा झाला आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा सप्टेंबरअखेर २२ ते २३ लाख लिटर तणनाशकांचा उपयोग होईल, असाही अंदाज आहे.

यंदा तणनाशकांचा उपयोग २० ते २५ टक्के अधिक होईल. पेरण्या वेळेत झाल्या आहेत. पिके तरारली. पण सततच्या पावसाने आंतरमशागतीसाठी वाफसा नाही. मजूरटंचाई आहे. मजुरीदर अधिक आहेत. ते परवडत नाहीत. ट्रॅक्टर, बैलजोडीने कापूस, केळी, सोयाबीन व अन्य तृणधान्य, कडधान्य पिकांत आंतरमशागत करण्यासाठी वाफसा नाही. यात तण वाढत आहे.

बाजारात विविध कंपन्यांचे तणनाशक विक्रीसाठी आहेत. कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर, मका, केळी, ऊस या पिकांसाठी स्वतंत्र तणनाशके बाजारात आहेत. त्यांचा वापर शेतकरी करीत आहेत. काही भागांत तण मोठे व पीक लहान अशीही स्थिती मागील आठ ते १० दिवसांत झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात कापूस, सोयाबीन व मका पिकांत तणनाशकांचा सर्वाधिक उपयोग केला जात आहे. कापसाची लागवड साडेपाच लाख हेक्टरपेक्षा अधिक आहे. मका लागवड एक लाख हेक्टरवर आहे. तर सोयाबीनची पेरणीदेखील जळगावात ३२ हजार हेक्टरवर झाली आहे. या पिकांत तणनाशके वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

‘एमआरपी’एवढे विक्री दर

मागणी वाढल्याचे लक्षात घेऊन तणनाशकांची विक्री एमआरपीएवढ्या दरात सुरू झाली आहे. मध्यंतरी एमआरपीपेक्षा १०० ते २०० रुपये कमी दर काही तणनाशकांच्या विक्रीसंबंधी होते. परंतु मागणी अधिक व पुरवठा कमी, नफेखोरी यातून आता एमआरपीनुसार त्यांची विक्री केली जात आहे.

यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. अनेक शेतकरी लहान केळी, भाजीपाला पिकांत मात्र तणनाशकांचा उपयोग टाळत आहेत. कारण ही पिके नाजूक व खर्चिक आहेत. त्यात तणनाशकांचा वापर केल्यास पुढे पिकाची मोठी हानी होईल, अशी भीती आहे. यामुळे लहान केळी, लहान मिरची, कलिंगड, कारली, काशीफळ व अन्य वेलवर्गीय पिकांत तणनाशकांचा वापर शेतकरी टाळत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agripreneurship MOU: कृषी विद्यापीठ, सह्याद्री फार्म्समध्ये करार

Jalalakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी प्रवाही योजनेचा २३ गावांतील शेतीला लाभ

Tiger Attack Compensation: सोनवणे कुटुंबाला १० लाखांचा धनादेश

Solapur Development Projects: वारी, कॉरिडॉर, आयटी पार्कला ‘टॉप प्रायोरिटी’

Sugarcane Payments Pending: उसाचे पेमेंट न मिळाल्याने शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT