Maharashtra Assembly Election 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के, झारखंडमध्ये १२.७१ टक्के मतदान

Jharkhand Assembly Election 2024 : महाराष्ट्र, झारखंड आणि चार राज्यांतील १५ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) सुरूवात झाली आहे. तसेच नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात आणि झारखंडमंधील दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला बुधवारी (ता.२०) सकाळी ६ वाजेपासून सुरूवात झाली आहे. याचबरोबर चार राज्यांतील १५ विधानसभेच्या जागांसह नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ६.६१ टक्के तर झारखंडमध्ये १२.७१ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले असून सत्ताधारी 'महायुती' आघाडी सत्ता राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर विरोधी महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येण्यासाठी धडपडत आहे. तर तिसऱ्या आघाडीसह, वंचित आणि राज ठाकरे यांच्या मनसेला देखील आपण सत्तेत येऊ असा आशावाद आहे. पण राज्यात नक्की कोणाची सत्ता येणार हे २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाल्यानंतरच समोर येणार आहे.

राज्यात मतदानाचा वेग मंदावला असून सकाळी ९ वाजेपर्यंत केवळ ६.६१ मतदान झाले आहे. दुसरीकडे झारखंडमध्ये मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात झाली असून येथे सकाळी ९ वाजेपर्यंत १२.७१ टक्के मतदान झाले आहे. झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ३८ जागांसाठी मतदान होत आहे. येथे 'इंडिया' आघाडीच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) च्या विरोधात भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) लढत होत आहे. याआधी १३ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले होते.

मोदी यांचे मतदारांना आवाहन

दरम्यान महाराष्ट्रातील मतदारांनी पूर्ण उत्साहाने मतदानात सहभागी होऊन लोकशाहीची शान वाढवावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (ता.२०) केले. त्यांनी ट्विटरवरून एका पोस्टमध्ये त्यांनी महिला आणि तरुण मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. असेच आवाहन त्यांनी झारखंडच्या मतदारांनाही केले असून मतदारांनी मतदानाचा विक्रम करावा, असे म्हटले आहे.

असे, फक्त भाजपच करू शकते : शरद पवार

बारामतीत मतदान केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील जनता शांततेत मोठ्या प्रमाणात मतदान करतील, असा मला विश्वास आहे. महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी मतदारांची असून ते कोणाला मत देणार, हे २३ नोव्हेंबरनंतर देशासमोर येईल, अशा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्यावरील आरोपांवर त्यांनी, ज्यांनी आरोप केले आहेत, ते अनेक महिने तुरुंगात होते. अशा लोकांना पुढे आणून आणि खोटे आरोप फक्त भाजपच करू शकते, असे पवार यांनी म्हटले आहे.

४ हजार १३६ उमेदवार रिंगणात

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून २८८ विधानसभा जागांसाठी ४ हजार १३६ उमेदवार रिंगणात आहेत. तर यंदा ९.७० कोटी जनता मतदानात भाग घेतील. एकूण मतदारांपैकी ५ कोटी पेक्षा जास्त पुरुष मतदार आणि ४.९० कोटी पेक्षा जास्त महिला मतदार आहेत. तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ६ हजार १०१ एवढी आहे.

१ लाख १८६ मतदान केंद्र

आयोगाच्या माहितीनुसार मतदानासाठी १ लाख १८६ मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. यात शहरात ४२ हजार ६०४ आणि ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ केंद्र असणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hawaman Andaj : पुढील आठवडाभर थंडी कायम राहणार; राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाचीही शक्यता

Banana Seedlings : ‘ईश्वेद’ची ग्रँड ग्रँड नाइन केळी रोपे आफ्रिकन बाजारपेठांत

Suhad Kande and Sameer Bhujbal : नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यात बाचाबाची; कांदेंची भुजबळांना जीवेमारण्याची धमकी

Amla Processing : आवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रे

Cotton Market : पांढरं सोनं शेतकऱ्यांसाठी यंदा ठरलं आतबट्ट्याचं; बाजारात कापसाला साधा हमीभावही मिळेना

SCROLL FOR NEXT