Parliament Winter Session Agrowon
ॲग्रो विशेष

Parliament Winter Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा गदारोळ; लोकसभेसह राज्यसभेचं कामकाज २७ नोव्हेंबरपर्यंत तहकूब

Rahul Gandhi On Sambhal Violence : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा पूर्ण निर्धार केला होता. त्याप्रमाणे अदानी, वक्फ दुरुस्ती विधेयकासह संभल जिल्ह्यातील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार गदारोळ केला.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून पहिल्याच दिवशी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. यामुळे लोकसभेसह राज्यसभेचं कामकाज २७ नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. आता बुधवारी संसदेच्या कामकाजाला सुरूवात होईल. विरोधकांनी अदानी प्रकरण, वक्फ दुरुस्ती विधेयकासह संभल जिल्ह्यातील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना गदारोळ केला.

इंडिया आघाडी आणि विरोधकांनी अधिवेशनाच्या आधीच अदानी प्रकरण, वक्फ दुरुस्ती विधेयक आणि इतर मुद्द्यावर चर्चा करण्याची सरकारकडे मागणी केली होती. पण अधिवेशनाच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी, जनतेनं ८० वेळा नाकारलेले लोक आज संसदे बंद पाडत असल्याची टीका केली होती.

यानंतर वरिष्ठ सभागृह राज्यसभेचे कामकाज दिवंगत खासदारांनाही श्रद्धांजली वाहून सुरू करण्यात आले. सभागृहात सभापती जगदीप धनखड यांनी सदनाच्या दिवंगत खासदारांच्या कामगिरीचा उल्लेख करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ

यानंतर गौतम अदानींच्या मुद्द्यावरून राज्यसभेत जोरदार गदारोळ झाला. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अदानी प्रकरणावर चर्चेची मागणी केली. परंतु धनखड यांनी नियमांचा हवाला देत त्यास परवानगी दिली नाही. गदारोळामुळे राज्यसभेच्या सभापतींनी सभागृहाचे कामकाज आधी ११.४५ वाजेपर्यंत तहकूब केले.

दरम्यान पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी पुन्हा गदारोळ सुरू केल्यानंतर सभापतींनी नराजी व्यक्त करत सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. संविधान दिनानिमित्त मंगळवारी (ता.२६) सभागृहाचे कामकाज सुरू राहणार नाही. यामुळे आता सभागृहाचे कामकाज बुधवारी (ता.२७) होणार आहे.

लोकसभेत ही विरोधकांचा आवाज घुमला

राज्यसभेचे कामकाज बंद पडल्यानंतर अदानी आणि वक्फ दुरुस्ती विधेयकाचे पडसाद लोकसभेतही उमटले. अदानी समूहाबाबत वेळोवेळी सरकारवर निशाणा साधणाऱ्या विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. अदानी प्रकरणावर चर्चा करण्यासह संभल जिल्ह्यातील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून सरकारने भूमिका मांडवी अशी मागणी काँग्रेसने केली. यावरून लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. मात्र कामका सुरू झाल्यानंतरही विरोधक आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने लोकसभेचे कामकाजही २७ नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

दरम्यान काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संभल हिंसाचारावरून ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. संभलमध्ये झालेल्या वादात राज्य सरकारची पक्षपाती आणि अतिघाईची भूमिका दुर्देवी आहे. सर्वांची बाजू ऐकून न घेता प्रशासनाने असंवेदनशीलपणे कारवाई करून वातावरण बिघडवले. याला थेट भाजप सरकार जबाबदार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

तसेच भाजप सत्तेचा दुरूपयोग करून हिंदू-मुस्लिम समाजात दरी आणि भेदभाव निर्माण करत आहे. जे राज्याच्या आणि देशाच्याही हिताचे नाही. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करावा आणि न्याय द्यावा, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे. तर संभलमधील हिंदू-मुस्लिम सजामाने शांतता राखावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

काय आहे संभल प्रकरण?

उत्तर प्रदेश राज्यातील संभल जिल्ह्यात शाही जामा मशिद असून मशिदीच्या सर्व्हेचे काम सुरू आहे. यादरम्यान रविवारी (ता.२४) मोठा हिंसाचार झाला. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर चार जणांचा मृत्यू पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT