The Kite Runner Agrowon
ॲग्रो विशेष

Book Review : पतंगामागे पळताना आयुष्याचा पाठपुरावा

पतंगाच्या चढाओढीमध्ये अनेक आयुष्येही पणाला लागलेली आहेत. विशेषतः मांजामुळे पक्ष्यांपासून माणसांपर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पतंगाच्या नादामध्ये आयुष्ये बदलून जातात. अफगाणिस्तानमध्ये घडलेली ही अशीच एक गोष्ट.

सतीश कुलकर्णी

लहानपणापासून जाळणारी एखादी घटना किंवा गोष्ट आयुष्याच्या अनेक टप्प्यांमध्ये तुमचा पाठपुरावा करत राहते. कोणी समोर नसताना आमीरने खेळायला जवळ केलेला हासरा मुलगा हसन, इतकीच त्याची खरी किंमत.

मात्र हसन आमीरसाठी आपला जीव ओवाळून टाकत असतो. आपल्या वडिलांच्या नजरेत भरण्याजोगे, कौतुक मिळविण्याजोगं काही करण्यासाठी आसुसलेला बारा वर्षांचा आमीर पतंगाची स्थानिक दंगल जिंकण्याचा निर्धार करतो.

त्याचा इमानी दोस्त हसत त्याला मदत करतो. आभाळात अगदी शेवटपर्यंत टिकून राहण्यासोबत काटलेला अखेरचा पतंग मिळविण्यासाठी प्रचंड धावाधाव करतो. मात्र त्या दिवशी संध्याकाळी घडलेल्या घटनेने दोघांचंही भावविश्‍व उद्‍ध्वस्त होते. पतंगाच्या खेळाच्या दिवशी घडलेल्या घटनेने आमीरच्या मनामध्ये एकाच वेळी स्वतःविषयी, आपल्या पळपुटेपणाविषयी घृणा भरून राहते.

मी वडिलांचा एकटा मुलगा असताना आपल्या गुलाम किंवा नोकराच्या (अलीच्या) मुलावर (हसन) आपले वडील इतके प्रेम का करतात, याचाच राग आमीरच्या मनामध्ये सातत्याने साचत गेलेला असतो. त्यामुळे वाढदिवसाच्या प्रसंगानंतर त्याला आपल्या घरातून हाकलून लावण्यासाठी चोरीचा आळ आणतो. त्यात अभिमानी अली व हसन घर सोडून निघून जातात.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बदलत्या राजकीय स्थितीमुळे आलेल्या अस्थैर्याच्या पार्श्‍वभूमीवर आमीरच्या कुटुंबालाही अफगाणिस्तान सोडून परागंदा व्हावे लागते. रशियन फौजांच्या कब्जानंतर खऱ्या अफगाणी लोकांचे जगणे दुस्तर झालेले असते. प्रथम पाकिस्तान आणि नंतर अमेरिकेत पोहोचलेल्या आमीर आणि त्याच्या वडिलांना आपले मूळचे अफगाणिस्तान कधीच सोडता येत नाही. त्यांचा जीव तिथे अडकलेला असतो.

विशेषतः आमीरच्या मनामध्ये एक बोचणारी जाणिव सातत्याने जागृत असते. त्यातूनच त्याला स्वतःच्या पळपुटेपणाबद्दल प्रायश्‍चित्त घेण्याची बोच लागते. शेवटी त्याला रहिमखानाचे (त्याच्या वडिलांचा जवळचा मित्र, भागीदार) बोलावणे येते. त्याने हातामध्ये सोपविलेल्या एका फोटोमध्ये हसन आणि त्याचा मुलगा हसताना दिसतो. हसन व त्याची पत्नी मारली गेल्याचे समजते.

मात्र त्याचा मुलगा तालिबान्यांच्या ताब्यात असलेल्या काबूलमध्ये अद्याप जिवंत असल्याचे कळते. त्याला आणण्यासाठी जाण्यावाचून त्याला गत्यंतर राहत नाही. या मुलाला किमान चांगल्या वसतिगृहात आणून ठेवण्याच्या उद्देशाने त्याची धडपड सुरू होते. मनाच्या दोलायमान स्थितीमध्ये सुरू झालेला प्रवास त्याला मानसिकदृष्ट्या स्थिरतेकडे नेतो.

दोन महासत्ता, धर्मवादी मानसिकता, मूळची कबिलावादी आणि त्यातून उगम पावलेली जहागीरदारी मानसिकता अशा वेगवेगळ्या पेचप्रसंगामध्ये ही गोष्ट उलगडत जाते. त्यातील एकेक पेच आपल्याला वाचक म्हणून गुंतवून ठेवतो. खालिद हुसैनी यांचे सुंदर आणि वाचण्यायोग्य पुस्तक. जागतिक पातळीवर नावाजलेले हे पुस्तक वैजयंती पेंडसे यांनी मराठीमध्ये अनुवादित केले असून, मेहता पब्लिशिंग हाउसने प्रकाशित केले आहे.

द काइट रनर

लेखक : खालिद हुसैनी

अनुवाद : वैजयंती पेंडसे

प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे

पाने : ३४६, किंमत : ३०१ रुपये

(वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rohit Patil NCP-SP : विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना मोठा फटका; तरिही सर्वात तरूण आमदार राष्ट्रवादीचाच

Maharashtra Assembly Result 2024 : अहिल्यानगर, नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा ‘सुपडासाफ’

Food Processing Industry : प्रक्रिया उद्योगात मिळविली ठळक ओळख

Food Processing Industry : ‘माऊली’ ब्रॅंड उत्पादनांचा होतोय विस्तार

Mango Orchard Management : आंबा मोहोरताना घ्यावयाची काळजी

SCROLL FOR NEXT