Nutritious Grain Award Agrowon
ॲग्रो विशेष

Nutritious Grain Award : कळसूबाई मिलेट उत्पादक शेतकरी कंपनीला ‘पोषक अनाज ॲवॉर्ड’

Kalsubai Millet Producer Farmer Company : भरडधान्ये बदलत्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांसाठी, तर ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरत आहेत. भरडधान्य प्रक्रिया व मूल्यवर्धन क्षेत्रात कामाची व्याप्ती वाढत आहे.

Team Agrowon

Nashik News : भरडधान्ये बदलत्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांसाठी, तर ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरत आहेत. भरडधान्य प्रक्रिया व मूल्यवर्धन क्षेत्रात कामाची व्याप्ती वाढत आहे.

या क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या संस्था व व्यक्तींना भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या भारतीय भरडधान्य संशोधन संस्था (ICAR-IIMR) यांच्या वतीने ‘उत्कृष्ट शेतकरी, उत्पादक कंपनी’ गटात ‘कळसूबाई मिलेट्स’ या संस्थेला ‘पोषक अनाज ॲवॉर्ड २०२४’ प्रदान करण्यात आला.

हैदराबाद येथे १८ ते २० ऑक्टोबर दरम्यान ‘भरडधान्य आंतरराष्ट्रीय अधिवेशन ६.०’ पार पडले. या कार्यक्रमात हा सन्मान ‘कळसूबाई मिलेट्स’ या शेतकरी संस्थेला देण्यात आला. या वेळी कर्नाटकचे कृषिमंत्री एल. चेल्लास्वामी उपस्थित होते. भारतीय भरडधान्य संशोधन संस्थेचे न्यूट्री हबचे मुख्य कार्यकारी व्यवस्थापक डॉ. बी. दयाकर राव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा नीलिमा जोरवर यांनी पुरस्कार स्वीकारला.

कळसूबाई मिलेट उत्पादक शेतकरी कंपनी ही महाराष्ट्रात मिलेट संवर्धनासाठी आदिवासी शेतकऱ्यांची मिळून असलेली कंपनी असून, पाच जिल्ह्यांतील १००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांसोबत काम करत आहे. भरडधान्य बीज संवर्धन, प्रक्रिया व मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती आणि बाजारपेठ मिळवून देण्यात अग्रेसर आहे.

सर्व प्रकारची ११ भरडधान्ये, देशी तांदूळ व देशी कडधान्ये तसेच मिलेटपासून बनवलेले कुकीज, शेव, चिवडा, पोहे व फ्लेक्स अशा एकूण १०० पदार्थांची किरकोळ व घाऊक विक्री केली जाते. या पुरस्कारामुळे महाराष्ट्रातील मिलेट संवर्धनास पाठबळ मिळाले आहे, असे जोरवर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT