Get Climate Change on the Political Agenda Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change: हवामान बदलाचा विषय राजकीय अजेंड्यावर यावा

Climate Change Must Be a Political Priority: हवामान बदलाचा विषय केवळ तज्ज्ञ-अभ्यासकांपुरता मर्यादित राहून चालणार नाही, तर तो राजकीय अजेंड्यावर यायला हवा, असे मत भवताल फाउंडेशन आयोजित ‘हवामान बदल समजून घेताना’ या विषयावरील कार्यशाळेत व्यक्त करण्यात आले.

Team Agrowon

Pune News: हवामान बदलाचा विषय केवळ तज्ज्ञ-अभ्यासकांपुरता मर्यादित राहून चालणार नाही, तर तो राजकीय अजेंड्यावर यायला हवा, असे मत भवताल फाउंडेशन आयोजित ‘हवामान बदल समजून घेताना’ या विषयावरील कार्यशाळेत व्यक्त करण्यात आले.

नागरिकांमध्ये हवामान बदलाविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच, त्यांना याबाबत नेमकी काय कृती करायची आहे याचे मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने भवताल फाउंडेशन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या वर्ल्ड क्लायमेट रिसर्च प्रोग्रॅम-आयआयटीएम हब यांच्या वतीने आयसर संस्थेमध्ये ही तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. 

या कार्यशाळेत आयसरचे डॉ. जॉय मोन्टेरो, डॉ. बिजॉय थॉमस, डॉ. छावी माथूर, भारतीय उष्णप्रदेशीय हवामान संस्थेच्या (आयआयटीएम) डॉ. आदिती मोदी, डॉ. विनीत सिंग, पर्यावरण अभ्यासक डॉ. गुरुदास नूलकर, भवताल फाउंडेशनचे संस्थापक व पर्यावरण अभ्यासक

अभिजित घोरपडे, ‘ॲग्रोवन’चे निवासी संपादक रमेश जाधव, सार्वजनिक आरोग्य क्षेत्राचे विश्लेषक डॉ. प्रदीप आवटे, सोपेकॉमच्या नेहा भडभडे, ऊर्जा-बॉक्सच्या विशाखा चांदेरे, भवताल फाउंडेशनचे वैभव जगताप, रिस्पायर कंपनीचे केविन जोशी आदींनी मार्गदर्शन केले.

शाश्वत विकास हाच पर्याय!

प्रा. नुलकर यांनी, वाढत्या शहरीकरणामुळे हवामानावर होणाऱ्या परिणामासंबंधी भाष्य करताना, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांच्यातला अत्यंत जवळचा व गुंतागुंतीचा सबंध समजून सांगितला. औद्योगिकीकरण, शहरीकरण, वाहतूक, ऊर्जा उत्पादने यांसारख्या आर्थिक क्रियाकल्पांमुळे पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो. परिणामी प्रदूषण, निसर्ग संसाधनांचा ऱ्हास, हवामान बदल यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर शाश्वत विकास हाच पर्याय आहे, असे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue: तरुण शेतकऱ्याने विविध मागण्यांसाठी घेतली नदीत उडी; शेतकरी बेपत्ता,प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू

Wildlife Terror : खरिपात वाघासोबत हत्तींची दहशत

Nanded Fertilizer Scam : जैविक खतांच्या थेट विक्रीप्रकरणी चौकशी सुरू

Viksit Bharat Scheme: तरुणांना १५ रुपये बोनस देणार; १ लाख कोटींची विकासित भारत योजना आजपासून सुरु

Fishing Season : नव्या हंगामात दर्यातून मासळीचे घबाड

SCROLL FOR NEXT