Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

Rain News : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून पडझडीचे प्रकार सुरू आहेत. बुधवारी (ता. १७) पहाटे आंबोली (ता. सावंतवाडी) घाटरस्त्यावर दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून पडझडीचे प्रकार सुरू आहेत. बुधवारी (ता. १७) पहाटे आंबोली (ता. सावंतवाडी) घाटरस्त्यावर दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तर भुईबावडा (ता. वैभववाडी) घाटरस्त्यातील संरक्षक भिंत कोसळली असून रस्त्याला भेगा पडल्या आहेत. दरम्यान सकाळपासून जिल्ह्यात सर्व पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत.

जिल्ह्यात मंगळवारी (ता. १६) पावसाचा जोर काहीअंशी कमी झाला होता. परंतु सायकांळी उशिरा पुन्हा पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस पडत होता. बुधवारी पहाटेपासून देखील जिल्ह्याच्या सर्व भागांत जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

मुसळधार पावसामुळे सावंतवाडी तालुक्यातील आंबोली घाटात दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटविण्यास सुरुवात केली आहे.

याशिवाय खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील भुईबावडा घाटातील संरक्षक भिंत कोसळली असून रस्त्याला देखील भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हा घाटमार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे.

सध्या वैभववाडी तालुक्यातील वाहतूक याच एकमेव मार्गाने सुरू आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून बुधवारी दुपारनंतर पावसाचे प्रमाण वाढले आहे. पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT