Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : पश्‍चिम विदर्भात पावसाचा जोर झाला कमी

Rain News : गेल्या तीन चार दिवसांपासून या भागात पावसाचे वातावरण तयार झालेले आहे. सुरुवातीला दोन दिवस असलेला जोर आता काहीसा कमी दिसून येत आहे.

Team Agrowon

Akola News : गेल्या तीन चार दिवसांपासून या भागात पावसाचे वातावरण तयार झालेले आहे. सुरुवातीला दोन दिवस असलेला जोर आता काहीसा कमी दिसून येत आहे. अधून-मधून रिमझिम पाऊस येत असल्याने शेतीतील बरीच कामे रेंगाळली आहेत. गेल्या २४ तासांत तुलनेने अकोला जिल्ह्यात (३२.९ मिलिमीटर) पावसाचा जोर होता. मात्र, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यांत पाऊस कमी झाला.

सध्या या भागात पावसाने ठाण मांडलेले आहे. गेले दोन दिवस अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात बाळापूर, अकोला या तालुक्यांमध्ये जोरदार हजेरी दिली. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातही विविध मंडलांमध्ये जोरदार पाऊस झाला. उर्वरित ठिकाणी पावसाचा जोर बराच ओसरलेला दिसून येत आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.

बुधवारी (ता.१७) सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झालेले होते. पहाटेच्या सुमारास काही काळ पावसाने हजेरीही दिली. नंतर दुपारपर्यंत पाऊस थांबलेला होता. हवामान खात्याने या भागात आणखी तीन दिवस येलो अलर्ट दिलेला असून सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

अतिवृष्टी झालेली मंडले

अकोला जिल्‍ह्यात हातरुण मंडलात १२१ मिलिमीटर, दहिहांडा १०१.८, उगवा १२३.८, आगर ८४.५, पळसो बुद्रुक ७७.५, बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव ११४.३, जलंब ८१.३, मनसगाव ८९.५ मिलिमीटर पाऊस झाला. ही मंडले वगळता उर्वरित ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झालेली आहे.

 जिल्ह्यांतील पाऊस

अकोला ः ३२.९ मिलिमीटर,

बुलडाणा ः १७.३ मिलिमीटर

वाशीम ः १४.७ मिलिमीटर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT