Banana Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Crisis : उन्हाच्या तीव्र झळांनी केळी बागा होरपळल्या

Drought News : परभणी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. पिण्यासह सिंचनासाठी पाण्याचे दुर्भिक्ष आहे.

माणिक रासवे

Parbhani News : जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे सिंचनासाठी पाणी नाही. त्यात मागील महिनाभरापासून तापमानात वाढ झाली आहे. उन्हाचा चटका वाढला आहे. परिणामी, जिल्ह्यातील केळी बागा होरपळून जात आहेत. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

परभणी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के पावसाची तूट आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. पिण्यासह सिंचनासाठी पाण्याचे दुर्भिक्ष आहे. जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा तालुक्यांतील गावांत सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता असते.

पुरेसे पाणी असलेले शेतकरी केळीची लागवड करतात. परंतु जायकवाडी धरण भरले नाही. त्यामुळे कालव्याद्वारे उन्हाळी हंगामातील आवर्तने मिळाली नाहीत. विहिरी, बोअर आदी सिंचन स्त्रोतांना पाणी नाही.

मार्चपासून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट झाला आहे. केळी पिकाला पाण्याची गरज वाढली आहे. परंतु सिंचनासाठी पाणी नसल्यामुळे घडे लागलेल्या अवस्थेतील केळीच्या बागा होरपळून गेल्या आहेत.

यंदा विहिरींना पाणी कमी आहे. जायकवाडी कालव्याचे पाणी मिळाले नाही. अडीच एकर केळी बाग वाचविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु पाणी कमी पडले. मार्चपासून तापमानात वाढ झाल्यामुळे केळीची साडेतीन हजार झाडे घडांसह होरपळून गेली आहेत. खर्च वाया गेला. सहा लाखांचे नुकसान झाले.
- माणिकराव सूर्यवंशी, सिंगणापूर, जि. परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ajit Pawar Funeral: 'अजितदादा अमर रहे'; लाखोंच्या उपस्थितीत अजितदादांना अखेरचा निरोप

Farmer Helpline : उत्तर प्रदेश सरकारची शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन; एका कॉलवर मिळणार अनुदान, योजनांची माहिती

Dharashiv Collector Office: शेतरस्त्यांशी संबंधित जीवनरेखा प्रणालीचा गौरव

Budget Session 2026 : देश सुधारणा एक्सप्रेसवर; अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले संबोधित

Ajit Pawar Death: ...आणि बारामती पोरकी झाली

SCROLL FOR NEXT