Pm Kisan Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Pm Kisan Installment : नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या हप्त्याचं ५ ऑक्टोबरला होणार वितरण

Dhananjay Sanap

Pune News : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ताच्या वितरणासह नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान १८ वा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा ५ वा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली आहे. तसेच नमोच्या पाचव्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकारने २ हजार २५४ कोटी रुपयांच्या निधी वितरणास सोमवारी (ता.३०) मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी दोन्ही हप्ते जमा होणार आहेत.

देशभरातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना जून महिन्यात नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम किसानच्या १७ व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं. त्यासाठी २० हजार कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने वितरित केला होता. तर नमोच्या ४ थ्या हप्त्याचं वितरण केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते परळी येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात करण्यात आलं होतं. त्यावेळी राज्य सरकारनं घाई गडबडीत निधीला मंजुरी दिली होती. तसेच घाई गडबडीने निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला होता. त्यामुळं बहुतांश शेतकऱ्यांना नमोचा चौथा हप्ता मिळाला नाही, अशी शेतकरी तक्रार करत होते. आता मात्र राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांचे प्रलंबित हप्त्याचे वाटपही ५ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

विधानसभा निवडणुकीचं गणित

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक अवघ्या दिवसांवर आली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना खुश करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे सोयाबीन कापूस अनुदान वाटप, पीकविमा, मदत निधी देणारे शासन निर्णय काढले जात आहेत. परंतु अंमलबजावणीत आखडता हात घेतला जातो. लोकसभा निवडणूकीत महायुतीला शेतकऱ्यांनी जोरदार दणका दिला होता. आता विधानसभेच्या निवडणुकीत दणका बसू नये, यासाठी महायुती सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भातही लोकसभा निवडणूकीत शेतकरी नाराजीचा झटका भाजपला बसला होता. त्यामुळे विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विदर्भावर विशेष लक्षकेंद्रित केलं जात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विदर्भातील विविध जिल्ह्यात दौऱ्यामागून दौरे सुरू झालेत.

दरम्यान, २०२३ च्या राज्य अर्थसंकल्पात राज्य सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर वर्षभरात शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी चार महिन्यांनी २ हजार रुपये याप्रमाणे ३ हप्त्यात केंद्र ६ हजार रुपये आणि राज्य सरकार ६ हजार रुपये देतं. म्हणजे शेतकऱ्यांना दिवसाला १७ रुपये ५० पैसे दिवसाला दिले जातात. अलीकडे या योजनेचे निकष अधिक कठोर करण्यात आले आहेत. त्यामुळे पीएम किसान योजनेतून राज्यातील ५ लाख शेतकरी बाहेर काढण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NDDB Dairy Services Kolhapur : परराज्यातील म्हशी मिळणार कोल्हापुरात, 'एनडीडीबी' डेअरी सर्व्हिसेसचा पुढाकार

Farmers protest : हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी ३ ऑक्टोबरला देशव्यापी रेल्वे रोको आंदोलन

October Rain Alert : ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यानही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार; हवामान विभागाचा अंदाज जाहीर

Crop Loan : अद्यापही दोन बँकांकडून एक रुपयाचेही पीककर्ज नाही

Kharif Crop Harvesting : पावसाच्या उघडिपीने खरिपाच्या सुगीला गती

SCROLL FOR NEXT