Sakhar ZP School Agrowon
ॲग्रो विशेष

ZP School Success: साखराच्या जि.प. शाळेचा प्रेरक प्रवास

Inspiring Rural School: शासकीय शाळांची दुरवस्था, तेथील दर्जा नेहमी चर्चेचा भाग बनलेला असतो. मात्र, अशाही परिस्थितीत वाशीम जिल्ह्यातील साखरा या हजार लोकवस्तीच्या गावातील जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा ही राज्याचे लक्ष वेधून घेत आहे.

 गोपाल हागे

Washim News: शासकीय शाळांची दुरवस्था, तेथील दर्जा नेहमी चर्चेचा भाग बनलेला असतो. मात्र, अशाही परिस्थितीत वाशीम जिल्ह्यातील साखरा या हजार लोकवस्तीच्या गावातील जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा ही राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. काही वर्षांपूर्वी ५२ एवढी अवघी विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेत आज १०६७ विद्यार्थी शिकत असून दरवर्षी या ठिकाणी प्रवेशासाठी वेटिंग लिस्ट लागते. लोकसहभाग, प्रशासनाचे पाठबळ आणि शिक्षकांकडून सातत्याने घेतली जाणारी कठोर मेहनत यामुळे हा बदल घडून आला आहे.

ही शाळा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा या नावाने ओळखली जाते. पहिली ते नववीपर्यंत येथे वर्ग भरतात. विशेष म्हणजे २०२३-२४ या वर्षासाठी मुख्यमंत्री ‘माझी शाळा -सुंदर शाळा’ या उपक्रमामध्ये शाळेला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. शाळेला ५१ लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळाले.

साखरा येथील ही शाळा २००८ पर्यंत पटसंख्येच्या चक्रव्यूहात अडकली होती. तेव्हा पहिली ते चौथीपर्यंत वर्ग भरायचे आणि पटसंख्या होती अवघी ५२ एवढी. पण त्या काळातील दूरदृष्टी असलेल्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या मेहनतीने शिक्षणाची गुणवत्ता वाढली. नवोदय शिष्यवृत्ती परीक्षा व विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचे यश मिळत गेल्याने आजूबाजूच्या गावांतील विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घ्यायला सुरुवात केली.

परिणामी वर्ग व तुकड्या वाढत गेल्या. शाळेची जागा अपुरी पडू लागल्यावर मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने गावकऱ्यांच्या सहकार्याने लोकवर्गणी करून दोन गुंठे जागा विकत घेऊन बांधकाम केले. तरीही जागा कमी पडल्याने गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावाची ई-क्लास ३७ एकर जमीन जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून शाळेच्या नावे दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने शाळेला नीती आयोगामार्फत तब्बल अडीच कोटी रुपये निधीही मिळवून दिला. त्यातूनच आज या शाळेची भव्य इमारत उभी आहे.

या शाळेमध्ये ३६५ दिवस नवोदयचा क्लास चालतो. त्याचबरोबर एनएमएस परीक्षेचासुद्धा ३६५ दिवस क्लास असतो. गेल्या वर्षी नवोदयमध्ये तब्बल २३ विद्यार्थी या शाळेतून पात्र झाले आहेत. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतसुद्धा ३८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. दरवर्षी ॲडमिशनसाठी वाशीम व आजूबाजूच्या २० ते २५ गावांतील विद्यार्थी येथे गर्दी करतात. खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेची शाळा वरचढ ठरली आहे.

(संपर्क : अंबादास कऱ्हे, मुख्याध्यापक, मो. ९७६३९२५६२०)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loss Compensation: मागणी ५७० कोटींची, मिळाले ३८ कोटी

Natural Farming: जमीन सुपीकतेसाठी नैसर्गिक शेती महत्त्वाची

Farmer Support: अतिवृष्टीबाधित शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात

Inspiring Farmer Story: दौंड्या काठची आरती अन् दीपक

Crop Loss Relief: अतिवृष्टी अनुदानाचे २५३ कोटी रुपये पोर्टलवर अपलोड

SCROLL FOR NEXT