POCRA 2 Agrowon
ॲग्रो विशेष

POCRA 2 : भागधारकांच्या मतानुसार होणार पोकरा-२ ची अंमलबजावणी

POCRA Project Implementation : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पाची दुसऱ्या टप्प्यात अंमलबजावणी होणार आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पाची दुसऱ्या टप्प्यात अंमलबजावणी होणार आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव देखील जागतिक बॅंकेला पाठविण्यात आला असून कर्ज मंजुरीची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जाते. त्या पार्श्‍वभूमीवर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात कोणत्या घटकांच्या अंमलबजावणीवर भर दिला पहिजे, हे जाणून घेण्यावर भर देण्यात आला आहे. त्याअंतर्गंत राज्यातील आत्मा प्रकल्प संचालकांशी पहिल्या टप्प्यात संवाद साधण्यात आला.

हवामान संवेदनशील गावांमध्ये व्यवसायिक पीकपद्धतीला प्रोत्साहन त्या माध्यमातून आर्थिक समृद्धी हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ, मराठवाड्यातील गावांचा समावेश होता. त्यातून व्यापक परिणाम साधता आल्याने आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

त्याकरीता राज्यातील २१ जिल्ह्यांची निवड करण्यात आल्याची माहिती प्रकल्पाचे कृषी विद्यावेत्ता विजय कोळेकर यांनी दिली. विदर्भातील ११, मराठवाड्यातील आठ तसेच जळगाव खांदेश आणि नाशिक अशा २१ जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या जिल्ह्यातून तब्बल ६५०० गावांची निवड प्रकल्पासाठी करण्याचे प्रस्तावीत आहे.

त्यासोबतच प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात कोणती कामे करावी हे स्टेकहोल्डर्सच्या माध्यमातून जाणून घेण्यावर भर देण्यात आला आहे. त्या अंतर्गंत ऑनलाइन पद्धतीने राज्यातील आत्मा प्रकल्प संचालकांशी संवाद साधण्यात आला. या वेळी आत्मा प्रकल्प संचालकांनी शेतीला जैविक कुंपण असावे अशी मागणी केली. त्याकरीता प्रकल्पात अनुदानात्मक योजना राबवावी, असेही सांगितले. पूर्व विदर्भातील धानपट्ट्यात टसर रेशीम शेती होते. त्याचाही विशेष बाब म्हणून प्रकल्पात समावेशाची मागणी या वेळी करण्यात आली.

दुबार पीकपद्धतीला मिळेल प्रोत्साहन

गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या धानपट्ट्यांतील जिल्ह्यांमध्ये एकच पीक घेतले जाते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बरी नाही. परिणामी या भागात पोकरा प्रकल्पातून दुबार पीक पद्धतीला प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी अनुदानात्मक योजना राबविण्याची मागणी या भागातील आत्मा प्रकल्प संचालकांकडून करण्यात आली.

पहिल्या टप्प्यात राज्यातील आत्मा प्रकल्प संचालकांची मते जाणून घेण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात केव्हीके तसेच कृषी विद्यापीठांशी संपर्क साधत त्यांच्या सूचना ऐकण्यात येतील. याआधारे पोकरा प्रकल्पाची दुसऱ्या टप्प्यातील अंमलबजावणी नियोजनबद्ध होणार आहे. जागतिक बॅंकेकडे कर्ज संबंधीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
विजय कोळेकर, कृषी विद्यावेत्ता, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT