Farmers Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Protest : 'दिल्ली चलो'मध्ये खोडा घातल्यानंतर हरियाणा सरकारी चर्चेची तयारी? आज शेतकरी नेत्यांशी चर्चा

Delhi Farmers Protest : गेल्या पाच महिन्यापसून आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या हरियाणा आणि पंजाबच्या शेतकऱ्यांच्या नेत्यांशी हरियाणा सरकार रविवारी (ता. २१) चर्चा करणार आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : हरियाणा-पंजाब उच्च न्यायालयाने हरियाणा सरकारला शंभू सीमा उघडण्याचे आदेश दिले. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून शंभू, खनौरी सीमेसह काही ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा 'दिल्ली चलो'चा मार्ग मोकळा झाला. मात्र हरियाणा सरकारने शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात धाव घेतली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान हरियाणा सरकारने शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी हरियाणा भवन येथे बोलावले आहे. रविवारी (ता.२१) प्रधान सचिव राजेश खुल्लर आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा होईल. त्यामुळे हरियाणा भवनमधील बैठकीत कोणता निर्णय होतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

रविवारी चर्चेसाठी सरकारने आमंत्रित केलेल्या संघटनांमध्ये किसान सभा हरियाणा, भारतीय किसान युनियन (बीकेयू, टिकैत) भारतीय किसान युनियन (नैन), भारतीय किसान युनियन (एकता उग्रह), भारतीय किसान युनियन मांगे राम, पगडी संभल जट्टा, भारतीय किसान मजदूर युनियन (कौठा), हरियाणा किसान सभा यांचा समावेश आहे. तसेच भारतीय किसान संघर्ष समिती, महिला किसान महासभा, राष्ट्रीय किसान मंच, क्रांतिकारी किसान युनियन देखील चर्चेसाठी बैठकीला जाणार आहे.

हरियाणाच्या शंभू सीमेवर हमीभावाच्या कायद्यासह विविध मागण्यांसाठी १३ फेब्रुवारी पासून हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. संयुक्त किसान मोर्चा (बिगर राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वात येथे आंदोलन सुरू आहे. तर शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर आणि जगजितसिंग डल्लेवाल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलक शेतकरी दिल्लीकडे जाण्यावर ठाम आहेत. याचदरम्यान हरियाणा-पंजाब उच्च न्यायालयाचा आदेश आला आहे. तर बॅरिगेटींग हटवण्याच्या शेवटच्या दिवशीच हरियाणा सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर सोमवारी (ता.२२) सुनावणी होणार आहे.

शंभू सीमा खुली करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सोमवारच्या सुनावणीआधी होणाऱ्या या बैठकीला विशेष महत्व आहे. तसेच याचदरम्यान सोमवारी 'दिल्ली चलो' मोर्चाबाबत विविध राज्यांतील शेतकरी संघटनांची बैठकही होणार आहे. यात युनायटेड किसान मोर्चा आणि संबंधित संघटनांदेखील सहभागी होणार आहेत. अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर विचारमंथन करण्याची शक्यता आहे.

तर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सरकारच्या अडचणी वाढू नये म्हणून सरकारला हरियाणातील शेतकरी संघटनांसोबत संवादाचा मार्ग खुला ठेवायचा आहे. तर नेहमीच संवाद आणि परस्पर समंजसपणाने तोडगा काढण्याचे धोरण अवलंबले असल्याचा दावा हरियाणा सरकारने केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

Solapur Assembly Election Result : सोलापूर जिल्ह्यात भाजपची सरशी

Maharashtra Vidhansabha Election Result : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश

BJP Dominance : महाराष्ट्रावरील भाजपची मांड पक्की

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT