Ground Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Ground Water Level : परभणी जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरीपेक्षा खालावली

Ground Water Level Decreased : भूजल पातळी खोल गेल्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील पाणी टंचाईचे संकट अधिकच गंभीर होणार आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरीपेक्षा खालावली आहे. यंदाच्या (२०२४) मार्च महिन्यात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भू वैज्ञानिक कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या निरीक्षण विहिरीतील नोंदीनुसार जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी सरासरी ८.७६ मीटर खोल गेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. भूजल पातळी खोल गेल्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील पाणी टंचाईचे संकट अधिकच गंभीर होणार आहे.

गतवर्षीच्या (२०२३) पावसाळ्यात परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३२ टक्के कमी पाऊस झाला. पावसाच्या पाण्याचे फेरभरण तसेच अनेक भागात जलसंधारणाच्या उपाययोजनांचा अभाव त्यामुळे भूगर्भात कमी प्रमाणात पाणी मुरले. विहिरी, बोअर तसेच विविध जल प्रकल्पांच्या पाणी पातळीत कमी वाढ झाली. सिंचनासाठी तसेच पाणीपुरवठ्यासाठी भूगर्भातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू आहे. त्यामुळे भूजल पातळी अधिकच खोल जात आहे.

यंदाच्या मार्च महिन्यात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेतर्फे जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील ८६ निरीक्षण विहिरींतील नोंदी घेण्यात आल्या. त्यानुसार सेलू तालुक्यातील भूजल पातळी सर्वाधिक खाली म्हणजे ११.३१ मीटर खोल तर पूर्णा तालुक्यातील भूजल पातळी सर्वात वर म्हणजे ६.०४ मीटर असल्याचे आढळून आले आहे.

२०१९ ते २०२३ या पाच वर्षांतील सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत जिल्ह्यातील भूजल पातळी खोल गेली आहे. आठ तालुक्यांतील भूजल पातळी तुलनेने अधिक खोल गेली आहे. सिंचनासाठी प्रवाही पद्धती वापर केल्यामुळे पाण्याची नासाडी होते. यंदा जायकवाडी, निम्न दुधना, माजलगाव या मोठ्या तसेच मासोळी व करपरा या मध्यम तसेच लघू प्रकल्पांच्या कालव्याची आवर्तने नाहीत. त्यामुळे पाणी मुरण्याचे प्रमाण कमी आहे.त्यामुळे भूजल पातळी खोलात गेली आहे.

मार्च महिन्यातील भूजल पातळी स्थिती (पातळी मीटरमध्ये)

तालुका निरीक्षण विहिरींची संख्या सरासरी पातळी मार्च मधील पातळी फरक

परभणी १४ ८.८१ ८.७१ ०.१०

जिंतूर २० ६.१२ ८.०३ -१.९१

सेलू १२ ७.३५ ११.३१ -३.४६

मानवत ४ ४.७४ ८.२० -३.४६

पाथरी ८ ६.७३ ९.५५ -२.८२

सोनपेठ ५ ६.२९ ८.९४ -२.६५

गंगाखेड ९ ७.४३ ९.७८ -२३५

पालम ७ ६.७१ ८.३३ -१.६२

पूर्णा ७ ४.२० ६.०४ -१.८४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT