Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं; पवारांनी वेधलं दुष्काळकडे लक्ष

पवार बुधवारी (ता.१६) मराठवाड्याच्या दौऱ्यांवर होते. त्यांनी कवी ना. धो. महानोर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

Team Agrowon

Drought : राज्यातील शेतकऱ्यांवर पेरणी आणि दुष्काळाच्या संकट आहे. अशावेळी सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं, असं मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार शरद पवारांनी व्यक्त केलं. पवार बुधवारी (ता.१६) मराठवाड्याच्या दौऱ्यांवर होते. त्यांनी कवी ना. धो. महानोर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आ. राजेश टोपे उपस्थित होते.

राज्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळ संकट आहे. "राज्यात यंदा पाऊस कमी आहे. आज पहिल्यांदा हवामान खात्यानं चांगला पावसाचा अंदाज दिला आहे. त्यांचा अंदाज खरा ठरला तर समर्थ साखर कारखान्याची साखर त्याच्या तोंडात पडो." अशी मिश्किल टिपणी पवारांनी बोलताना केली.

पुढे पवारांनी राज्य आणि केंद्र सरकारचं राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीकडे लक्ष वेधलं. पवार म्हणाले, "दुष्काळ आणि दुबार पेरणीच्या संकटात केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे."

दरम्यान, पवारांनी अजित पवारांच्या भेटीबद्दलही खुलासा केला. पवार म्हणाले, "अजित पवार आणि माझी भेट झाली. परंतु ती कौटुंबिक भेट होती. मी कुटुंबातील वडीलधारा व्यक्ती आहे. त्यामुळे कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय मला विचारून घेतले जातात." असं म्हणत पवारांनी भूमिका स्पष्ट केली. शिवसेना आणि भाजप यांच्यातील प्लॅन बीची सुद्धा केवळ चर्चा आहे, असं म्हणत पवारांनी महाविकास आघाडीत कसलीही अडचण नसल्याचे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Return Monsoon : गेले परतीच्या वाटे...

Insurance Reform Bill : हिवाळी अधिवेशनात विमा सुधारणा विधेयक मांडणार

Onion Market : लासलगाव बाजार समितीत नवीन खरीप कांद्याची आवक

Sugarcane Farming : राज्यात सलग पावसामुळे ऊसपट्ट्यावर संकटाची छाया

Rabi Season : रब्बी विकसित कृषी संकल्प अभियानावर तज्ज्ञांचा बहिष्कार

SCROLL FOR NEXT