Sugar Mill Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Mill Loan : थोपटे, कोल्हेंचे कारखाने थकहमीपासून वंचित

बाळासाहेब पाटील

Mumbai News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि लोकसभा निवडणुकीत विरोधात काम करणाऱ्या काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि शंकरराव कोल्हे यांना राज्य सरकारने कोंडीत पकडत त्यांच्या साखर कारखान्यांना थकहमी नाकारली आहे.

पहिल्या यादीत १३ कारखान्यांना १८९८ कोटी रुपयांची थकहमी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नव्याने आदेश काढत ११ कारखान्यांना १५९०.१६ कोटी रुपयांची थकहमी देण्याचा शासन आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.

राष्ट्रीय सहकार निगमकडून आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारच्या थकहमीवर कर्ज देण्यात येते. या कारखान्यांची निवड करण्यासाठी सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली आहे.

या समितीने याआधी १३ सहकारी साखर कारखान्यांची यादी तयार करून मंजुरी दिली होती. मात्र, राजकीय विरोधक असलेल्या संग्राम थोपटे आणि शंकरराव कोल्हे यांच्या कारखान्यांची नावे वगळून नव्याने शासन आदेश प्रसिद्ध केला आहे.

राज्यातील १३ सहकारी साखर कारखान्यांना थकहमी देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीने २७ मार्च रोजी राष्ट्रीय सहकार विकास निगमला प्रस्ताव पाठविला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या काळात या प्रस्तावावर कार्यवाही होऊ नये याची दक्षताही घेतली होती. दरम्यान, काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांच्या कारखान्यालाही थकहमी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र, त्यानंतर मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेऊन या दोन कारखान्यांच्या नावावर फुली मारण्यात आली.

एनसीडीसीने थकहमी दिलेले कारखाने (रक्कम कोटीत)

- लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना (धारूर, बीड) : ९७. ७६ लाख

- श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा : ९४ लाख

- वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, पाथर्डी : ९३

- लोकनेते मारुतीराव घुले पाटील सहकारी साखर कारखाना, नेवासा : १४० कोटी

- किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना, वाई : ३२७ कोटी

- किसनवीर खंडाळा सहकारी साखर कारखाना, खंडाळा : १४० कोटी

- अगस्ती सहकारी साखर कारखाना, अकोले : ९४ कोटी

- श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, वारणानगर : ३२७ कोटी

- श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना, उमरगा : ९४

- अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, अंबाजोगाई : ८० कोटी

- सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा : १०३ कोटी ४० लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Green Soybean : हिरव्या सोयाबीनचा आहारात वाढवा वापर

World River Day : चला साजरा करूयात नद्यांचा उत्सव

NAFED Issue : नाफेडचा पर्याय शेतकऱ्यांच्या माथी मारू नका

Infestation Rice & Sugarcane : शेतकरी दुहेरी संकटात, भातावर खोड किड तर उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT