Sujay Vikhe Agrowon
ॲग्रो विशेष

Sujay Vikhe : झेडपीत टक्केवारी घेऊन निधी वाटला

तीन वर्षांत सत्तेचा वापर करून कर्जत तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना संपविण्याचे काम करण्यात आले, मात्र याबाबत कोणी बोलत नाही.

Team Agrowon

Nagar News : आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) सत्तेच्या काळात पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नगर जिल्ह्याच्या हक्काचे बावीस टीएमसी पाणी पळवले. जिल्हा परिषद अध्यक्ष, बांधकाम व समाजकल्याण सभापतींनी टक्केवारी घेऊन विकासकामासाठी निधी वाटला, असा आरोप खासदार डॉ. सुजय विखे (MP Sujay Vikhe) यांनी केला आहे.

डॉ. विखे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रवादीवर निशाणा साधला असल्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे.

नगर जिल्हा परिषदेत गेल्या काही महिन्यांपासून प्रशासक आहे. जिल्ह्यातील सर्वच नेत्यांना जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची ओढ लागली आहे. प्रशासक येण्याच्या आधी जिल्हा परिषदेत राज्यातील सरकारप्रमाणेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी यांची सत्ता होती.

अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, तर उपाध्यक्षपद भाजपकडे होते. लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होतील असे गृहीत धरून प्लॅनिंग केले जात आहे. त्यातून आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत.

सोमवारी (ता. १३) कर्जतमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे

‘‘तीन वर्षांत सत्तेचा वापर करून कर्जत तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना संपविण्याचे काम करण्यात आले, मात्र याबाबत कोणी बोलत नाही. नगर जिल्ह्यात ५० वर्षांच्या राजकारणात कोणीही आणि कधीही सत्तेचा वापर कार्यकर्ते आणि पक्ष संपविण्यासाठी केला नाही.

पक्षाची बाजू मांडणाऱ्यावर व्यक्तिगत स्वरूपाचे हल्ले करीत पक्षप्रवेश घडवून आणले. जिल्हा परिषद अध्यक्ष, बांधकाम व समाजकल्याण सभापतींनी टक्केवारी घेऊन विकासकामासाठी निधी वाटला. सुजय विखे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधल्याने आता राजकीय आरोप-प्रत्यारोप पुन्हा सुरू होणार आहेत.

‘विनाभ्रष्टाचार कामे मार्गी लागतील’

‘विजेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सौरऊर्जेचा वापर वाढवणे महत्त्वाचे आहे. ठेकेदाराकडून टक्केवारी न घेतल्यामुळे नगर-सोलापूर रस्त्याचे ७० टक्के काम वर्षात पूर्ण झाले.

शासन आपल्या दारी या उपक्रमातून सर्वसामान्यांचे प्रश्‍न विनाभ्रष्टाचार मार्गी लागतील,’ असेही सुजय विखे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Roll Revision Protest: ‘एसआयआर’ प्रक्रिया थांबवा : डाॅ. अजित नवले

Tomato Farming Success Story: टोमॅटो शेतीतून प्रगती गाठलेले बोरीबेल

Drought Management: सरपंचांनो, गावाचा ताळेबंद मांडा..

Minimum Support Price: ‘कमी’भाव जाहीर

Drought Mitigation: दुष्काळ निवारणाला द्या नवा आयाम

SCROLL FOR NEXT