
Nagar ः ‘‘जिल्हा लोकसंख्या आणि आकारमानाने मोठा असल्यामुळे प्रशासनावर मोठा ताण येतो, जनतेची कामे वेळेवर होत नाहीत त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे ही आपली पूर्वीही भूमिका होती आणि आजही आहे आणि त्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील,’’ असे प्रतिपादन आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde) यांनी केले.
आमदार राम शिंदे यांची भाजप प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांकडून नगर येथे सत्कार करण्यात आला. बाजार समितीच्या शेतकरी भवनात झालेल्या कार्यक्रमाला माजीमंत्री शिवाजी कर्डिलेसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रारंभी कर्डिले यांनी जिल्हा विभाजनाचा मुद्दा मांडला त्यावर त्यावर बोलताना आमदार राम शिंदे यांनी जिल्हा विभाजन झाले पाहिजे याचा पुनरुच्चार केला.
ते म्हणाले, ‘‘पालकमंत्री असल्यापासून जिल्हा विभाजनाची भूमिका घेतलेली आहे आणि आजही त्या भूमिकेवर कायम आहे. चार- चार आमदार असणाऱ्या कोकणातील जिल्ह्यांना स्वतंत्र अधिकारी आहेत पण अहमदनगर जिल्हा लोकसंख्या आणि आकाराने सर्वात मोठा आहे.
जिल्ह्यात दोन खासदार आहेत. त्यामुळे प्रशासनावर कामाचा फार मोठा ताण येतो परिणामी जनतेची कामे वेळेवर होत नाहीत. त्यामुळे जिल्हा विभाजन झालेच पाहिजे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अनुकूल आहेत.
विभाजनासाठी सर्व प्रयत्न केले जातील. मतदार संघात खूप कामे केली. पुस्तक वाचून, कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, कॉपी करून आमदार होता येत नाही. पण कार्यकर्त्यांच्या प्रेमाने पुन्हा आमदार झालो. खरे तर राज्यसभेचा खासदार होता होता विधानपरिषद आमदार झालो,’’ असे सांगताना ते भावुक झाले.
‘दोन मंत्रिपदे तरी मिळावीत’
आमदार राम शिंदे म्हणाले, ‘‘राज्यात २७ फेब्रुवारी पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणारच आहे. जिल्ह्याला प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये आजवर ३ मंत्री पदे मिळत आली आहेत. तीन नाही तर किमान दोन तरी मंत्री जिल्ह्याला मिळतील यासाठी आपण प्रयत्न करू.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.