Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department: मंडल कृषी अधिकाऱ्याने अडवणूक केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Farmer Issue : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेततळे, फळबाग योजनेसह विविध योजनांचा लाभ दिला जातो. हा लाभ देताना मंडल कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

Team Agrowon

Nagar News : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेततळे, फळबाग योजनेसह विविध योजनांचा लाभ दिला जातो. हा लाभ देताना मंडल कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

याबाबत संबंधिताची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी देशमुखवाडी (ता. कर्जत) येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री, कृषिमंत्री, कृषी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. देशमुखवाडी (ता. कर्जत) येथील जवळपास ४५ शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री धनंजय मुंडे, कृषी आयुक्त व कृषी विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांना निवेदन पाठवून आपली व्यथा मांडली आहे.

पुरावे देऊनही कारवाई होईना

कृषी विभाग शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या योजना राबवते. मात्र या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ देताना मंडल कृषी अधिकारी शेतकऱ्यांची अडवणूक करत पैशाची मागणी करतात. पैसे न दिल्यास शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत.

पैसे दिल्याशिवाय कुठल्याही प्रकारचे बिल काढले जात नाही. यासंदर्भात आम्ही ऑडिओ, व्हिडिओसह अन्य पुरावे दिले. कृषी विभागाकडे सातत्याने मागणी तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा देशमुख वाडीच्या शेतकऱ्यांचा आरोप आहे.

आम्ही कृषी विभागाकडे पुरावे देऊन कारवाईची मागणी केली. मात्र अद्यापपर्यंत दखल घेतली जात नाही. कारवाई झाली नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत.
राहुल दंडे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT