Maharashtra Assembly Election 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Election 2024 : भावी आमदारांचे भवितव्य नवमतदारांच्या हाती; १८ ते १९ वयोगटातील २२ लाख मतदार

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली असून उमेदवार प्रचारासाठी बाहेर पडले आहेत. तर खरा प्रचार आता दिवाळीनंतर सुरू होणार आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली असून उमेदवार बाहेर पडले आहेत. पण यंदाची निवडणूक महिला आणि नवमतदारांच्या हाती असणार आहे. ही बाब निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदारांची संख्या आणि वयोगाटामुळे उघड झाली आहे. नवमतदार २२ लाखांपेक्षा अधिक आहेत. यामुळे राजकीय पक्षांसह उमेदवारांना आपल्या प्रचाराची नीती बदलावी लागणार आहे.

निवडणूक आयोगाने याआधीच राज्यातील मतदारांची आकडेवारी ३० ऑक्टोबरला जाहीर केली होती. त्यानुसार राज्यात एकूण मतदार ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ आहेत. यापैकी ५ कोटी २२ हजार ७३९ पुरूष आणि ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार आहेत. तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ६ हजार १०१ एवढी आहे.

१ लाख १८६ मतदान केंद्र

आयोगाने वयोगटानुसार राज्यातील मतदारांची संख्या जाहीर केली असून मतदान केंद्राची आकडेवारी देखील प्रसिद्ध केली आहे. आयोगाच्या माहितीनुसार मतदानासाठी १ लाख १८६ मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. यात शहरात ४२ हजार ६०४ आणि ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ केंद्र असणार आहेत.

आयोगाच्या माहितीनुसार १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या २२ लाख २२ हजार ७०४ आहे. यामध्ये पुरुष मतदार १२ लाख ९१ हजार ८४७ आणि महिला ९ लाख ३० हजार ७०४ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या १५३ इतकी आहे. २० ते २९ या वयोगटात १ कोटी ८८ लाख ४५ हजार ००५ मतदार असून यात पुरुष १ कोटी १ लाख ६२ हजार ४१२ आहेत. तर महिला मतदार ८६ लाख ८० हजार १९९ असून तृतीयपंथीय मतदारांची संख्या २३९४ आहे.

३० ते ४० वयोगटातील मतदारांमध्ये पुरुष मतदार १ कोटी ११ लाख २१ हजार ५७७ असून महिलांची संख्या १ कोटी ६ लाख ९१ हजार ५८२ आहे. तर तृतीयपंथी मतदारांची संख्या २ हजार ११९ असून एकूण मतदार एकूण २ कोटी १८ लाख १५ हजार २७८ आहेत. ४० ते ४९ या वयोगटातील एकूण मतदार २ कोटी ७ लाख ३० हजार ५९८ असून पुरुष मतदार १ कोटी ७ लाख ४९ हजार ९३२ आणि महिला मतदार ९९ लाख ७९ हजार ७७६ आहेत. या गटात तृतीयपंथी मतदारांची संख्या ८९० इतकी आहे.

१ कोटी ५६ लाख १० हजार ७९४ मतदारांची संख्या ५० ते ५९ वयोगटातील असून यात महिला मतदार ७७ लाख ५६ हजार ४०८, तृतीयपंथी मतदार ३३४ आणि पुरुष मतदार ७८ लाख ५४ हजार ०५२ आहेत. ६० ते ६९ वयोगटातील एकूण मतदार ९९ लाख १८ हजार ५२० असून ५० लाख ७२ हजार ३६२ पुरुष मतदार आहेत. या वयोगटातील तृतीयपंथी मतदारांची संख्या १३३ असून महिला मतदार ४८ लाख ४६ हजार २५ आहे.

तर ५३ लाख ५२ हजार ८३२ मतदारांमध्ये पुरूष मतदार २६ लाख ३६ हजार ३४५ हे ७० ते ७९ वयोगटातील आहेत. याच वयोगटातील महिला मतदार २७ लाख १६ हजार ४२४ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ६३ इतकी असल्याचे आयोगाने सांगितले आहे. ८० ते ८९ वयोगटातील मतदारांची संख्या सांगताना ती २० लाख ३३ हजार ९५८ असून यात महिला मतदार ११ लाख १८ हजार १४७ आणि तृतीयपंथी मतदारांची संख्या १३ नोंदवली आहे. तर पुरुष मतदार ९ लाख १५ हजार ७९८ आहेत.

शंभरी पार केलेल्या मतदारांची संख्या

यावेळी आयोगाने वयाची शंभरी पार केलेल्या मतदारांची देखील आकडेवारी दिली असून ती १०० ते १०९ वयोगटाची आहे. यात ४७ हजार १६९ मतदारांमध्ये पुरूष २० हजार ९८३, महिला मतदार २६ हजार १८४ आणि तृतीयपंथी मतदारांची संख्या २ आहे. तर ९० ते ९९ या वयोगटात ४ लाख ४८ हजार ३८ मतदार असून पुरुष मतदार १ लाख ९७ हजार ३२३ तर महिला मतदारांची संख्या २ लाख ५० हजार ७१५ इतकी आहे.

११० ते ११९ वयोगटात ५२ पुरूष मतदार असून महिला मतदारांची संख्या ६१ आहे. १२० वर्ष असणारे मतदारही असून त्यांची संख्या ११० आहे. यात पुरूष मतदार ५६ तर महिला मतदारांची संख्या ५४ आहे. ८५ ते १५० वयोगटामधील एकूण १२ लाख ४० हजार ९१९ मतदारांची नोंद झाली आहे. यात ५ लाख ४२ हजार ८९१ पुरुष, ६ लाख ९८ हजार ०२२ महिला आणि ६ तृतीयपंथी मतदारांचा समावेश असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.

दिव्यांग आणि सेवा दलातील मतदार

तसेच १०० ते १५० या विशेष वयोगटात ४७ हजार ३९२ मतदारांमध्ये २१ हजार ९१ पुरुष, २६ हजार २९९ महिला आणि २ तृतीयपंथी मतदार आहेत. दिव्यांग मतदारांमध्ये पुरुष मतदार ३ लाख ८४ हजार ६९, महिला मतदार २ लाख ५७ हजार ३१७ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ३९ इतकी एकूण मतदार ६ लाख ४१ हजार ४२५ आहेत. तसेच सेवा दलातील (सर्व्हिस व्होटर्स) एकूण १ लाख १६ हजार १७० मतदार असून यात १ लाख १२ हजार ३१८ पुरुष आणि ३ हजार ८५२ महिला मतदार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : हरभरा दरात नरमाई; कापूस, सोयाबीन, हरभरा तसेच काय आहेत केळीचे दर ?

Maharashtra Election 2024 : बुलडाणा जिल्ह्यात छाननीत १८७ अर्ज वैध; १२ अवैध

Cotton Market : ओलाव्यामुळे कापसाचे कापसाचे भाव कवडीमोल; सीसीआयने खरेदी करण्याची मागणी

Women Voters In Assembly Election : राज्यातील ३८ मतदार संघात ठरणार महिलाच किंगमेकर; पुरूषांपेक्षा महिला मतदारांची सख्यां अधिक

Ujani Dam : उजनी धरणातून शेतीला यंदा गरजेनुसार सुटणार ३ आवर्तने, १११ टीएमसी पाणीसाठी शिल्लक

SCROLL FOR NEXT