E Peek Survey Agrowon
ॲग्रो विशेष

E-Peek Survey : ई-पीक पाहणीला मिळाला ९३ टक्‍के खातेदारांचा प्रतिसाद

E-Peek Pahani Update : १५ मार्च या अखेरच्या तारखेपर्यंत रब्बी हंगामात ९३ टक्‍के म्हणजे १.१२ लाख शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पार पाडली.

Team Agrowon

Amravati News : हस्तलिखित नोंदी आता बंद झाल्या आहेत. ई-पीक पाहणीद्वारे ऑनलाइन पीकपेरा नोंदवावा लागतो. जिल्ह्यात या उपक्रमाला व्यापक प्रतिसाद मिळत १५ मार्च या अखेरच्या तारखेपर्यंत रब्बी हंगामात ९३ टक्‍के म्हणजे १.१२ लाख शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पार पाडली.

पीकपेऱ्या संदर्भात हस्तलिखित नोंदीमध्ये गैरप्रकार होण्याची शक्‍यता होती. त्या पार्श्‍वभूमीवर शासनाने ऑनलाइन नोंदीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेत ई-पीक पाहणीवर भर दिला. यामध्ये शेतकऱ्यांना ॲपच्या माध्यमातून स्वतःच नोंदणी करावी लागते.

रब्बी हंगामासाठी १५ फेब्रुवारीर्पंत ९३१८२ शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली होती. त्यानंतर राहिलेल्या पीकपेऱ्याच्या नोंदी तलाठ्यांद्वारे घेण्यात येत आहेत. याद्वारे १८,०००६ खातेदारांचा पीकपेरा नोंदविण्यात आला. उर्वरित नोंदीकरिता शासनाकडून १५ मार्चपर्यंतची डेडलाइन निश्‍चित करण्यात आली होती.

या मुदतीत ९३२०४ खातेदारांनी व १८९५१ खातेदारांची तलाठीस्तरावर पीकपेरा नोंदविण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तालुकानिहाय नोंदणी (खातेदार)

धारणी ४०९३

मोर्शी १२११३

अचलपूर १४२९७

तिवसा ५१९३

वरुड २३३४९

चांदूरबाजार १२९६३

भातकुली २९२४

अंजनगावसूर्जी ७०५५

अमरावती ४०७९

चांदूररेल्वे ४९४९

चिखलदरा ३९९१९

दर्यापूर ४०७२

नांदगाव खंडेश्‍वर ६४११

धामणगावरेल्वे ६७३८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parliament Winter Session 2025: हिवाळी अधिवेशन २०२५: संसद पुढील अधिवेशन काळापर्यंत तहकूब; आठ महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी

Soybean Farmers Protest: हमीभावासाठी किसान मोर्चाचे लातूर बाजार समितीसमोर धरणे

Rabi Crop Insurance: रब्बी पीकविम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

Natural Sugar Factory: शेतकऱ्यांना ‘एआय’चा फायदा देणारा ‘नॅचरल’ राज्यातील पहिला कारखाना: राजकुमार मोरे

Climate Change: बदलत्या हवामानास अनुकूल वाणांच्या निर्मितीची गरज

SCROLL FOR NEXT