Loan for Sugar Factories Agrowon
ॲग्रो विशेष

Loan for Sugar Factories : नगर जिल्हा सहकारी बँकेच्या कामकाजात अनियमितता? साखर कारखान्यांना मर्यादा डावलून कर्जाचे वाटप

Nagar District Cooperative Bank : नगर जिल्ह्यातील नगर जिल्हा सहकारी बँकेच्या कामकाजात अनियमितता असल्याची तक्रार काहीच दिवसांपूर्वी जेष्ठ नेते शरद पवार यांनी केली होती. त्यानंतर आता नाशिक येथील विभागीय सहनिबंधकांनी बँकेशी संबंधित १९ मुद्द्यांचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Nagar News : सध्या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या कामकाजात अनियमितता व गंभीर स्वरूपाचे दोषांची चर्चा सुरू आहे. यावरून नाशिक येथील विभागीय सहनिबंधकांनी बँकेशी निगडीत १९ मुद्द्यांचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. तर याचप्रकरणी गेल्या आठवड्यात मुंबई येथील एका कार्यक्रमात जेष्ठ नेते शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली होती. यानंतर आता विशेष लेखापरीक्षकांमार्फत तपासणी करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधकांनी दिल्याने नगर जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे.

नगर जिल्हा सहकारी बँकेचे भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले अध्यक्ष असून बँकेवर सर्वपक्षीय प्रस्थापित नेत्यांची संचालक मंडळात वर्णी आहे. याच बँकेच्या कामकाजाबाबत काही अहवाल व तक्रारी सहकार विभागाकडे याआधी गेल्या होत्या. त्यावरून नाशिकच्या सहनिबंधकांनीही बँकेची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

तर बँकेवर कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्यासह पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील साखर कारखान्यास मर्यादा डावलून कर्जाचे वाटप केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर या कारखान्यांची कर्जाची मर्यादा संपलेली असतानाही अनुक्रमे ३२५ कोटी व ३७८ कोटींचे कर्ज देण्यात आले आहे. तसाच प्रकार अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत देखील करण्यात आला असून कारखान्याला ३७८ कोटींचे कर्ज दिले आहे. यावरून बँकेच्या कारभारावर शंका उपस्थित केली जात आहे.

लोकनेते मारुतराव घुले-पाटील, मुळा सहकारी साखर कारखाना, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना व कर्मवीर भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यांना देखील असेच कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. तर बँकेने अशोक सहकारी साखर कारखान्याची स्टॅम्प ड्युटी वसुली न करताच कर्जाचे वाटप केले आहे. सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याला देखील नोंदणीकृत गहाणखत न करताच करताच कर्जाचे वाटप करण्यात आल्याचे समोर आले आहे.

बँकेने कारखान्यांबाबत मर्यादा ओलांडून केलेले कर्जाचे वाटप, सीडीएस संगणक प्रणालीतील घोळ, बँकेची शेती कर्जाची थकबाकीसह विविध १९ मुद्द्यांवरून प्रभारी विशेष लेखापरीक्षक डी. आर पाटील यांच्यामार्फत तपासणी केली जाणार आहे. तर पाटील यांनी याबाबत बँकेकडून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT