Nagar District Bank : नगर जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या अनुदानावर डल्ला मारल्याचा आरोप

Maharashtra Government : शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत अनुदान दिले जाते.
Nagar District Bank
Nagar District Bankagrowon
Published on
Updated on

Ahmednagar News : राज्यातील शेतकरी सोसायटींकडून कर्जाची उचल करून ते कर्ज नियमीत पणे भरतात अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत अनुदान दिले जाते.

मात्र, नगर जिल्हा बँकेकडून ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होताना घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही रक्कम तब्बल तीन वर्षे भरली गेली नसल्याने जवळपास ६३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत. याबाबत नगर महाआघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत थेट सवाल उपस्थित केला.

यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हापरिषद सदस्य संदेश कार्ले म्हणाले की, राज्य शासनाकडून सोसायटीचे नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत अनुदान दिले जाते. मात्र, ते शेतकर्‍यांच्या खात्यावर कधी आणि किती वर्ग होते, हे शेतकर्‍यांना माहित नाही.

तसेच सोसायटीलाही समजत नाही. ही बाब काही शेतकर्‍यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर आम्ही दि.१९ मे २०२३ रोजी जिल्हा उपनिबंधकांना पत्र देऊन या संदर्भातील माहिती मागविली होती. त्यांच्याकडून दि.१४ जून २०२३ रोजी माहिती प्राप्त झाली.

Nagar District Bank
Onion Subsidy for Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील ३१ हजार अपात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळणार अनुदान

त्यानुसार गेल्या ३ वर्षांत तब्बल ६३ कोटी रूपये जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा बँकेच्या तालुका कार्यालयाला जमा केले. मात्र, जमा रकमेची तारीख आणि शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झालेल्या रकमेच्या तारखेमध्ये मोठा विलंब दिसून येत आहे.

खंडाळा व पिंपळगाव लांडगा या दोन गावांतील प्रत्येकी दोन अशा एकूण चार शेतकर्‍यांच्या बँक खात्याचे स्टेटमेंट पाहिले असता, व्याजाची रक्कम खात्यात जमा झालेल्या तारखेत आणि उपनिबंधक कार्यालयाच्या तारखेत मोठी तफावत दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करताना मोठा ढपला पाडल्याचा आरोप महाआघाडीच्या नेत्यांनी केला.

शासनाने शेतकर्‍यांसाठी १ रूपयात पीकविम्याची घोषणा केल्यावर केवळ प्रसिद्धीसाठी पीकविम्याची रक्कम जिल्हा बँक भरेल, अशी घोषणा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी केली. ही बाब हास्यास्पद आहे. त्याऐवजी त्यांनी व्याजाची ६३ कोटी रक्कम शेतकर्‍यांना कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन कार्ले यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com