Bedane Agrowon
ॲग्रो विशेष

Bedane Rate: बेदाण्याला चांगला उठाव

Bedane Market : दर्जेदार बेदाण्याला प्रति किलोस १०० ते २१० रुपये दर मिळत आहे. गेल्या महिन्यापासून बेदाण्याचे दर टिकून असून दर स्थिर राहतील, असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : गेल्या महिनाभरात देशभरातून बेदाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे बेदाण्याचा चांगला उठावही होत आहे. दर्जेदार बेदाण्याला प्रति किलोस १०० ते २१० रुपये दर मिळत आहे. गेल्या महिन्यापासून बेदाण्याचे दर टिकून असून दर स्थिर राहतील, असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला.

दिवाळीच्या सुट्टीनंतर बाजारपेठेत देशातील व्यापारी बेदाणा खरेदीसाठी लगबग करत आहेत. सध्या बेदाण्याला मागणी आणि उठावही आहे. दर टिकून असल्याने बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना या दराचा फायदा होत आहे.

राज्यात गतवर्षी सुमारे ३ लाख टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते. गतवर्षी फेब्रुवारीपासून नव्या बेदाण्याची विक्री सुरू झाली. डिसेंबरअखेर २ लाख ६० हजार टन बेदाणा विक्री होऊन ४० हजार टन बेदाणा शिल्लक आहे.

जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जवळापास ८० ते ९० टक्के बेदाण्याची विक्री होईल. पुढील महिन्यातही दर टिकून राहतील, अशी शक्यता व्यापारी व्यक्त करित आहेत.

सांगलीतील बेदाणा निर्मितीचा हंगाम सर्वसाधारणपणे जानेवारीच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होतो. त्यामुळे शेडच्या दुरुस्तीची लगबग असली तरी, दुरुस्तीला फारशी गती आलेली नाही. नागज परिसरात बेदाणा तयार करण्यासाठी दहा ते पंधरा शेड सज्ज झाले आहेत.

बेदाण्याचे प्रतवारीनुसार

दर (प्रति किलो)

हिरवा १००-२१०

पिवळा १००-१९०गेल्या महिन्यापासून बेदाण्याला चांगली मागणी आणि उठाव आहे. त्यामुळे दर टिकून आहेत. फेब्रुवारीअखेर पुरेल इतका गत हंगामातील बेदाणा शिल्लक आहे.
सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gondia Water Level Drops: गोंदियात फक्त ३१ टक्के पाणीसाठा; जलसंकट गडद

Dudhana Dam Water Level: निम्न दुधना प्रकल्पामध्ये ३९.७७ टक्के पाणीसाठा

Agriculture Department Inspection: कोकण विभागातील खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी हालचाली

Tifan Krishi Gaurav Award: अवॉर्ड संस्थेचा तिफण कृषी गौरव पुरस्काराने सन्मान

Agri Service Centres Inspection: कृषी केंद्रांवर अचानक तपासणी

SCROLL FOR NEXT