Wayanad Tragedy  Agrowon
ॲग्रो विशेष

Wayanad Landslide : वायनाडच्या भूस्खलनातील मृतांची संख्या तीनशेवर

Wayanad Natural Calamity : वायनाडच्या भूस्खलनात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या शुक्रवारी (ता. २) तीनशेवर पोहोचली.

Team Agrowon

Wayanad News : वायनाडच्या भूस्खलनात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या शुक्रवारी (ता. २) तीनशेवर पोहोचली. मुडक्कई, चूरलमला, अट्टामला, नूलपुझ्झा गावांत मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास भूस्खलन झाल्यानंतर विविध भागांतील सुमारे नऊ हजार जणांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.

बचावपथकाकडून बेपत्ता लोकांचा शोध सुरू असून लष्कराने चार दिवसांपासून एकाच ठिकाणी अडकून पडलेल्या चौघांना जीवंत आणि सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले. फोनवरील शेवटचे लोकेशनवरून त्यांचा शोध घेण्यात आल्याचे लष्कराने सांगितले.

वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनातील मृतांची संख्या ३१३ वर पोहोचली असून १३० जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच चौथ्या दिवसानंतरही दोनशेहून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. त्यांच्या मोबाइलच्या लोकेशनच्या मदतीने त्यांना शोधले जात आहे.

लष्कराचे जनरल कमांडिग मेजर जनरल व्ही. टी. मॅथ्यू म्हणाले, की मुडक्कई, चूरलमल, अट्टामला, नूलपुझ्झा गावातील मदतकार्य थांबविले असून, आता केवळ मृतदेह आणि बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी वायनाडच्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

चौघे जीवंतपणे बाहेर

भूस्खलनात शेकडो नागरिक दबलेले असताना त्यांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. आज चौथ्या दिवशी चौघांना जीवंतपणे बाहेर काढण्यास लष्कर, बचाव पथकाला यश आले. पाडावेत्ती कुन्नू जवळील निर्जन भागात आज सकाळी या चार जणांचा शोध लागल्याचे लष्कराने सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US Trade Deal: भारत-अमेरिका कराराचा आपल्या शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल?; खर्गेंचा सरकारला सवाल

India US Trade: अमेरिकन आयातशुल्काचा मागील चार महिन्यात महाराष्ट्राला फटका; कृषी निर्यातीत २६.६% घट

MGNREGA Workers Protest: मनरेगा कर्मचारी आंदोलनात; ग्रामीण भागात कामे ठप्प

Monkey Crop Damage: आजऱ्यात माकडांचा वाढला उपद्रव

Rose Harvesting: व्हॅलेंटाईनसाठी गुलाबाची काढणी आणि व्यवस्थापनाच्या टिप्स

SCROLL FOR NEXT