Kukdai  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : ‘कुकडी’चे आवर्तन सुटले

Kukadi Canal : कुकडीच्या आवर्तनाच्या नियोजनासंदर्भात यापूर्वीच झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनाची तारीख नंतर ठरविण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदे आणि कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन कुकडीच्या डाव्या कालव्याचे उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन गुरुवारपासून (ता. ३०) सुरू झाले.

यामुळे श्रीगोंदा, कर्जत व पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. मात्र ‘आमच्यामुळे पाणी सुटले’ असे दावे करीत जिल्ह्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. कुकडीच्या आवर्तनाच्या नियोजनासंदर्भात यापूर्वीच झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनाची तारीख नंतर ठरविण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.

मात्र, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत या तालुक्यांमध्ये निर्माण झालेली पाणी टंचाई तसेच पिण्याच्या पाण्यासाठी नगर आणि सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची केलेली मागणी विचारात घेऊन मंत्री विखे यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कुकडी डाव्या कालव्यांमध्ये पाणी सोडण्याबाबत तातडीने निर्णय करण्याच्या सूचना दिल्या.

सध्या कुकडी प्रकल्पाचा पाणीसाठा संपुष्टात आला असून, डाव्या कालव्याचे आवर्तन करण्यासाठी पिंपळगाव जोगे धरणातील मृत साठ्यातून पाणी घेणे आवश्यक होते. त्या‍नुसार २५ मेपासून पिंपळगाव जोगे धरणातून येडगावमध्ये पाणी घेण्यात येत आहे. आवर्तनाच्या निर्णयानुसार कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन गुरुवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आवर्तन सुटले.

नेमका पाठपुरावा कोणाचा?

आवर्तनाबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून माहिती देण्यात आली. याबाबत पाठपुरावा केल्याचे सांगितले गेले. तर माजी आमदार नीलेश लंके यांनीही पाठपुरावा केल्याचे सांगितले आहे. याशिवाय जिल्ह्यातील अन्य नेतेही पाठपुरावा केल्याचे सांगत आहेत. त्यामुळे श्रेयवादाची लढाई जोरात सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation: ठिबक अनुदान वाटपाची सध्याची प्रणाली दर्जाहीन

Agriculture GST Reduction: ‘जीएसटी’ कपातीतून ‘कृषी’ला दिलासा

Maharashtra Rain Update: मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार सरींची शक्यता

Free Utensils Scheme: बांधकाम कामगारांसाठी खास कल्याणकारी योजना; मिळणार मोफत गृहउपयोगी वस्तू

Plastic Flower Ban : कृत्रिम फुलांवर बंदीबाबत निर्णयाची अंमलबजावणी कधी?

SCROLL FOR NEXT