Kaustubh Divegaonkar Agrowon
ॲग्रो विशेष

Kaustubh Divegaonkar : हवामान बदलाचे आव्हान

Article by Kaustubh Divegaonkar : गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. उस्मानाबादही त्याला अपवाद नाही.

Team Agrowon

या सगळ्या घडामोडींची स्थानिक वृत्तपत्रांनी दखल घेतली, गावनिहाय यशोगाथा त्यांच्या स्थानिक वार्ताहरांनी प्रकाशित केल्या. ‘अतिक्रमणमुक्त शेतरस्ते’ या मोहिमेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी फेसबुक आणि व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडिया टूल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. अतिक्रमण झालेले रस्ते शोधण्यासाठी काही ठिकाणी गुगल अर्थचा वापर करण्यात आला. जिओ टॅगिंगचे फोटोही वापरले गेले.

संपूर्ण जिल्ह्यात या मोहिमेचे चांगले परिणाम दिसून आले. सप्टेंबर २०२२ अखेर सुमारे ७८० गावांतील सुमारे ३२ हजार ७९५ शेतकऱ्यांना लाभ झाला. सुमारे ९६५ किमी (आता १००० किमी) लांबीचे शेतरस्ते खुले करून वापरात आले. एकूण ८९६ रस्ते खुले करण्यात आले. अगदी ५० वर्षांपासून रखडलेले शेतरस्त्यांचे प्रश्‍नही या मोहिमेत सुटले. या मूलभूत महसुली कामातून प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याला समाधान मिळाले.

अशा स्वरूपाची मोहीम इतक्या व्यापक प्रमाणावर राबविणारा उस्मानाबाद हा एकमेव जिल्हा ठरला. तत्कालीन महसूलमंत्री आणि महसूल सचिवांनी त्याचे कौतुक केले. उस्मानाबाद जिल्ह्याच्या यशोगाथेनंतर मार्च २०२३ मध्ये महसूल विभागाकडून राज्यभर विशेष मोहिमेचे निर्देश देण्यात आले होते.

हवामान बदलाचे आव्हान

गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. उस्मानाबादही त्याला अपवाद नाही. या जिल्ह्यात २०२० आणि २०२१ अशी सलग दोन वर्षे ऑक्टोबर महिन्यात दोन-तीन दिवसांत अतिवृष्टी होऊन विविध ठिकाणी पूर परिस्थिती (फ्लॅश फ्लड) निर्माण झाली.

उस्मानाबाद सारख्या दुष्काळी भागात सलग दोन वर्षे विविध ठिकाणी मिळून १२०० लोकांना पुरातून बाहेर काढावे लागले. २०२१ या वर्षी तर हवाईदलाच्या हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. लोकांचे जीव वाचविण्यात आम्ही यशस्वी ठरलो. पण या सगळ्यात शेतीचा प्रश्‍न बिकट होत आहे.

सोयाबीनसारख्या पिकाचे ऐन काढणीच्या वेळी पुराने नुकसान होणे, पाऊस पुरेसा पडूनही दुष्काळी भागात हाती आलेले पीक जाणे, पावसातील खंड वाढणे, पर्जन्य दिन कमी होणे, कमी वेळात जास्त तीव्रतेचा पाऊस पडणे, पावसाने दीर्घ काळ ओढ देणे असे प्रकार वाढत चालले आहेत.

यंदाच्या वर्षी मात्र पाऊस कमी आहे. अशा विषम परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल होत आहेत. पंचनामे वेळेत करून एनडीआरएफची मदत पाठवणे हा एक भाग झाला; पण भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाचे दुष्टचक्र भेडसावत आहे.

सोबत येलो मोझॅक, शंखी गोगलगाय अशा रोगराई, जैविक हल्ल्यांमुळे सोयाबीनसारखे नगदी पीक संकटात येत आहे. त्यामुळे इतःपर अशा पर्यावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला सज्ज व्हावे लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

Kesar Mango Cultivation : मराठवाडा, विदर्भातील केसर आंबा उत्पादनातील संधीची मांडणी

Horticulture Development : आंबा पुनरुज्जीवनासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT