Sillod Chili Agrowon
ॲग्रो विशेष

Sillod Chili : सिल्लोडच्या मिरचीचा ठसका वाढणार! जीआय मानांकनासाठी करणार केंद्रीय पथक पाहणी

GI Rating to Sillod Chili : झणझणीत, अति तिखट मिरची म्हटले की आठवते ते सिल्लोडची ठसकेदार मिरची. आता ही जगभर जाणार आहे. यासाठीचा मार्ग मोकळा झाला असून या मिरचीला लवकरच जीआय मानांकन म्हणजेच भौगोलिक मानांकन मिळणार आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात झणझणीत, अति तिखट मिरची मिळते. ही मिरची तालुक्यातील आमठाणा, शिवना आणि गोळेगाव या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असते. अशा या अति तिखट मिरचीच्या जीआय मानांकन म्हणजेच भौगोलिक मानांकनाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी लवकरच केंद्रीय तज्ज्ञांचे मंडळ पाहणी करण्यासाठी मार्च महिन्यात सिल्लोडमध्ये येणार आहे.

सिल्लोड तालुक्यात लाल मिरची ही उग्र आणि अतितिखट असून ती बुरशीला दाद देत नाही. तर ही मिरची टिकाऊ ही आहे. या तालुक्यातील आमठाणा, शिवना आणि गोळेगाव येथील मातीत झिंक, मँगनीज, फॉस्फरस व ह्युमिक अॅसिडचे प्रमाण अधिक आहे. तसेच येथे तापमान ही अधिक असते. त्यामुळे या मिरचीत कैंपसेनॉईड घटक मोठ्या प्रमाणात येतो.

दरम्यान चेन्नई येथील जीआय केंद्रीय तज्ज्ञांचे पथक हे जीआय मानांकनाच्या परीक्षणासाठी तालुक्यातील २० गावात जाणार आहे. या पथकाडून माती परीक्षण, पाण्याचे नमुन्यांसह इतर माहिती गोळा केली जाणार आहे.

सिल्लोडची मिरची जाते विदेशात

सिल्लोडची झणझणीत आणि अति तिखट मिरची ही फक्त महाराष्ट्र किंवा देशातच खाली जाते असे नाही. तर ही मिरची बांगलादेश, पाकिस्तानसह दुबई आणि अरब देशांमध्ये निर्यात केली जाते.

अभिनव प्रतिष्ठानचे प्रयत्न

सिल्लोडच्या या मिरचीला जीआय नामांकन मिळावे म्हणून सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठान प्रयत्न करत आहे. या प्रतिष्ठानचे किरण पवार व डॉ. संतोष पाटील यांनी यासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयास प्रस्ताव पाठवला होता. यानंतर लवकरच केंद्रीय तज्ज्ञांचे मंडळ पाहणी करण्यासाठी सिल्लोडमध्ये येणार आहे.

राज्यातील ३४ उत्पादनांना जीआय मानांकन

याच्याआधी राज्यातील इतर ३४ उत्पादनांना जीआय मानांकन मिळाले आहे. ज्यात देवगडचा हापूस, नाशिकची द्राक्षे, वाहेगावची हळद, अलिबागचा पांढरा कांदा, नागपुरी संत्र्यांसह जळगावची केळी आणि भरीत वांगी यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका; गावांमध्ये शिरले पाणी, बचावकार्य सुरु

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

SCROLL FOR NEXT